Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रेयसीशी बोलतो म्हणून मित्राची हत्या..

प्रेयसीशी बोलतो म्हणून मित्राची हत्या..


आपल्या प्रेयसीशी बोलतो म्हणून एका तरुणाने आपल्याच मित्राची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. तेवढ्यावरच न थांबता त्याने मित्राचं गुप्तांग कापून त्याचं हृदय बाहेर काढलं. या हत्येनंतर आरोपी तरुणाने आत्मसमर्पण केलं असून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही घटना हैदराबाद येथील आहे. आरोपीचं नाव हरिहर कृष्ण असं आहे. हरिहर आणि मृत तरुण नवीन हे दोघंही महाविद्यालयीन काळापासून मित्र होते. कॉलेजमध्ये असताना त्यांना एकच मुलगी आवडत होती. पण, नवीन आणि त्या तरुणीत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. काही काळ नात्यात राहिल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर हरिहरने तरुणीशी मैत्री वाढवली आणि तिच्याशी प्रेमाचे संबंध निर्माण केले.

पण, हरिहरला नेहमी नवीन आणि आपल्या प्रेयसीविषयी संशय होता. नवीनसोबत नातं संपल्यानंतरही सदर तरुणी त्याच्या संपर्कात होती. ही बाब हरिहरला समजल्यानंतर त्याला संताप अनावर झाला आणि त्याने नवीनला मारण्याचा कट रचला. 17 फेब्रुवारी रोजी याच कारणावरून हरिहर आणि नवीनचं भांडण झालं. त्या भांडणाची परिणती हाणामारीत झाली. यातच हरिहरने नवीनचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचं गुप्तांग कापलं, त्याचं हृदय कापून बाहेर काढलं. त्याचं शीर कापलं आणि बोटही छाटली. त्याचे फोटो काढून त्याने प्रेयसीला पाठवले. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी हरिहरने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आणि त्याला अटक करण्यात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.