Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंबानी, बच्चन, धर्मेंद्र यांची घरे बाँबने उडवण्याची धमकी!

अंबानी, बच्चन, धर्मेंद्र यांची घरे बाँबने उडवण्याची धमकी!


नागपूर : एका अज्ञाताने मुंबईतील उद्योगपती, फिल्म स्टार यांच्या घरांमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्याने नागपूर पोलिसांना याबाबत फोन केल्याचे समजते. उद्योजक मुकेश अंबानी यांचा अँटिलिया बंगला तसेच अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्या घरात स्फोट करण्याची धमकी देणारा फोन नागपूर पोलिस नियंत्रण कक्षात आला होता.

महानायक अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडचे विंटेज अभिनेते धर्मेंद्र यांच्याही घरांवर बॉम्ब हल्ला करेन अशी धमकी देण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी या बाबत मुंबई पोलिसांना माहिती देत अलर्ट केले आहे. मुंबई पोलिस फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

याआधीही मुकेश अंबानींचे घर अँटिलियाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. ऑगस्ट 2022 मध्येही मुकेश अंबानी यांच्या घरावर बॉम्बस्फोट करण्याचे कॉल आले होते. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी अशाच प्रकारच्या धमकीने देशभरात खळबळ उडाली होती. प्रत्यक्षात दुपारी अँटिलियाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना एक संशयास्पद स्कॉर्पिओ कार दिसली. ज्याची माहिती तत्काळ मुंबई पोलिसांना देण्यात आली व तात्काळ तपास सुरु झाला होता.

मुंबई श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथकांनी या वाहनाचा तपास केला. दरम्यान या वाहनातून जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. तसेच या वाहनात मुकेश अंबानी यांच्या वाहनांशी मिळत्या जुळत्या नंबर प्लेट्स सापडल्या होत्या. या प्रकरणाची खूप चर्चा झाली व याचा दिर्घकाळ तपास चालू होता. पुढे याला राजकीय वळण सुद्धा लागले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसातील एक पोलिस अधिकाऱ्यावर संशय घेतण्यात आला होता. अद्याप याबाबतची केस सुरु आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.