सांगली शहराची अवस्था बकाल...
आपल्या सांगली शहराची अवस्था सगळ्याच बाबतीत अशी मोडकळीस आलेली दिसते. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही,शेरीनला प्रकल्प अजून ही रखडला आहे,महापूर तर पाचिला पुजला आहे त्या बाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत अलमट्टी धरणाची उंची वाढवायला म्हणावा असा विरोध केला जात नाही,कित्येक वर्षापासून संघर्ष केल्यावर आता कुटे सांगली पेठ रस्ता टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे,सांगली कोल्हापूर रोड तर अजून लाल फितीत अडकला आहे,जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असूनही राष्ट्रीय महामार्ग ची म्हणावी अशी कनेक्टिव्हिटी मिळालेली नाही,सांगली पलूस रस्ता,सांगली विठा रस्ता म्हणजे तालुक्यातील लोक सांगलीला येताना दहा वेळा विचार करतात कारण रस्ते अरुंद व खड्डे माय झालेले आहेत.
सांगली शहरातील उपनगरातील ड्रेनेज योजनेचे वाठोले झाले आहे,कोणताही मोठा उद्योग आलेला नाही,कवलापूर विमानतळ विकसित करण्यात आले नाही,एम आय डी सी मध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत,प्रस्तावित डी पी रोड ची तर वाट लागली आहे, सा मी कू मनपा स्थापन होऊन पंचवीस वर्षे झाली काय अवस्था आहे सर्वांना माहीत आहे,एखादे सुसज्ज असे नाट्य गृह नाही,क्रीडा संकुल असून नसल्यागत आहे.
सांगली रेल्वे स्टेशन म्हणवे त्या पद्धतीने विकसित करण्यात आले नाही,सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन, एम आर आय मशीन नाहीत,राज्यातील सगळ्या बाजार समितीत्याचे तालुका वाईज विभाजन झाले आहे मात्र सांगली , कवठेहांकाळ आणि जत अश्या तीन तालुक्याची बाजार समिती ठेवली आहे. अश्या अनेक समस्या आहेत कोणीही सिरियस नाही. सांगलीची प्रगती होऊ नये असे कोणाला वाटत असेल हा खरा प्रश्न आहे ह्या साठी सांगली करानी डोळस पणाने अभ्यास केला आहे आता ती वेळ आली आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.