Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली घरजागेच्या वादातून मायलेकीला दमदाटी..

सांगली घरजागेच्या वादातून मायलेकीला दमदाटी..



सांगली: शहरातील कत्तलखाना परिसरात घरच्या जागेच्या वादातून रिजवाना जावेद पटेल आणि त्यांच्या मुलीला दमदाटी करण्यात आल्याची घटना घडली. काल ही घटना घडली असून शहर पोलिसांनी संशयीत गुलाब अब्बास पटेल ( रा. कारदगा, ता. निपाणी, जि. बेळगाव) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी सांगितले, की शहरातील कत्तलखाना परिसरात रिजवाना पटेल या राहतात. काल संशयीत गुलाब पटेल त्यांच्या घरात घुसला. शिवीगाळ करत घर कधी खाली करणार आहेस, असा जाब विचारुन त्याने शिवीगाळ सुरु केली. त्यावेळी रिजवाना यांनी या घराबाबत कोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे घर सोडणार नाही, असे सांगितले. याचा राग आल्याने संशयीत मारायला धावला. फिर्यादीने पोलिसांना फोन करते, असे म्हणताच तुम्हा दोघींना सोडणार नाही, अशी धमकी देवून संशयीताने पलायन केले. पोलिस अधिक तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.