Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत जागा व्यवहारातून दांपत्यास मारहाण.

सांगलीत जागा व्यवहारातून दांपत्यास मारहाण.


सांगली, ता. १६:
जागा व्यवहाराच्या कारणातून सहा जणांनी दांपत्यास मारहाण केल्याची घटना कसबे डिग्रज येथे घडली. याबाबत इम्रान अब्दुल पटेल (वय ३५, रा. मारुती मंदिर नजीक, कसबे डिग्रज ता. मिरज ) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी काशिनाथ शिंदे, विकास नलवडे, यशवंत सकपाळ, राजू नलवडे यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. 

फिर्यादी इम्रान पटेल हे गावात असलेल्या त्यांच्या घराशेजारील बाकडड्यावर बसले असता संशयीत सहा जण तेथे आले आणि त्यांनी जागेच्या व्यवहारावरुन वाद घातला. यावेळी संशयीतांनी फिर्यादी इम्रान पटेल आणि त्यांची पत्नी अलीशा यांना काठीने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.