जेव्हा जिल्हाधिकारी कचेरी ओस पडते....
सांगली : सांगलीचे पालकमंत्री जिल्ह्याचे दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालय आज ओस पडले होते. जिल्हाधिकारी रजेवर गेलेत. त्यांच्यापाठोपाठ अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी सुद्धा नाहीत. त्यामुळे संपूर्ण कचेरी ओस पडली असून कोणी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार दिसेनात. आपली कैफियत घेऊन भेटायचे कुणाला? असे कोडे शुक्रवारी सांगलीत आलेल्या जनतेला पडले. आता शनिवार, रविवार सुट्टीनंतर सोमवारी तरी अधिकारी उगवणार का? याची चिंता जनतेला लागली आहे. ज्ञ क्ष अधिकाऱ्यांनी दांडी मारली की त्यांनी हक्काच्या रजा घेतल्या? एकाच दिवशी सर्व अधिकारी अचानक गेले कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शुक्रवारचा दिवस म्हणजे आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस. पुढचे दोन दिवस आणि सोमवारी उशिरा येणारे अधिकारी यामुळे लोक गुरुवार, शुक्रवारी आपली कामे घेऊन जिल्हा प्रशासनाच्या दारात येतात. मात्र जिल्हाधिकारी राजा दयानिधी रजेवर असल्याने राजाच नसल्याने जिल्हाधिकारी कचेरीची सगळीच प्रजा सुद्धा निवांत झालेली दिसून आली. शुक्रवारी दुपारी अप्पर तथा प्रभारी जिल्हाधिकारी उपस्थित नव्हत्या. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यालया बाहेर आजचा दिवस अकरा ते एक जनतेला भेटण्यासाठी राखीव होता. त्या काही कारणाने बाहेर असतील म्हणून नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालय गाठले. तिथे त्यांच्या कार्यालयाचे कर्मचारी सोडले तर कोणीही नव्हते. इतके प्रमुख अधिकारी नसतील तर महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांच्याकडे लोकांनी भेटावे अशी पूर्वीपासूनची प्रथा आहे. वैशिष्ट्य म्हणजे तेही हजर नव्हते. संपूर्ण कार्यालय फिरून काढले तेव्हा पुरवठा शाखेचे तहसीलदार बारकुल यांच्याकडे संपूर्ण जिल्हाधिकारी कचेरीचा पदभार असावा असे वातावरण होते. बारकूल यांना आपल्या खात्यातील लोकांची गर्दी सांभाळण्याचे आधीच टार्गेट असते. त्यात इतर जनतेलही त्यांच्याकडेच भेटण्या शिवाय पर्याय नव्हता.
रिकाम्या खुर्चीचे पत्रकारांना दर्शन
ही बाब पत्रकारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सहज संपूर्ण जिल्हाधिकारी कचेरीत फेरफटका मारला. तेव्हा बहुतांश उपजिल्हाधिकारी आणि अनेक तहसीलदार दर्जाचे अधिकारी सुद्धा आपल्या खुर्चीवर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे काम घेऊन आलेल्या लोकांना आल्या पावली माघारी फिरण्याशिवाय पर्याय नव्हता.
मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असूनही...
शासनाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर गर्दी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री यांचे कार्यालय प्रत्येक जिल्हाधिकारी कचेरीत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून त्या कचेरीचा पदभार असताना सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हते. या प्रकाराची राज्य शासनाने, सामान्य प्रशासन विभागाने आणि पुणे विभागीय आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि एकाच वेळी सगळ्या अधिकाऱ्यांनी दांड्या मारणे किंवा हक्काच्या रजा घेणे त्याला पायबंद घालावा अशी मागणी होत आहे.
मिंदे सरकारच्या या कारभाराचा राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील सर्व सामान्य जनतेला फटका बसत आहे.यापूर्वी काँग्रेस सह अनेक पक्षांची सरकार येऊन गेली. विशेष म्हणजे भाजपाचे सरकार असताना व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अशा कुठल्याही प्रकारचा अनुभव सर्वसामान्य जनतेला आलेला नाही. मात्र सध्या पैशाची गणती करून खुर्ची मिळणाऱ्या अनेक अधिकाऱ्याकडून हा अनुभव राज्यभर येत आहे. सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचा एकूण कारभार पहाता ते ही याच पठडीतील असल्याची भावना सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय ओस पडले... अशा बातमी नंतर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने खुलासा करण्यात आला की जिल्हाधिकारी दिवसभर कार्यालयात बसून होते. मात्र दर शुक्रवारी ते कुणाला ही भेटत नाहीत,...असा फलक ही त्यांच्याच कार्यालयात आहे.शिवाय त्यांचे स्वीट सह्यायक ही हेच सांगतात
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.