Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी

अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी


कॅलिफोर्निया:  उत्तर अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा कॅलिफोर्नियातील सॅन जोस शहरातील एका उद्यानातून चोरीला गेला आहे. सॅन होजे येथील पार्क, रिक्रिएशन आणि नेबरहूड सर्व्हिसेस विभागाने शुक्रवारी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे अमेरिकास्थित भारतीयांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधून या उद्यानातून हा पुतळा कधी चोरी झाला याबद्दल माहिती मिळू शकली नाही, असे स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनी टीव्हीयूने रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

उत्तर अमेरिकेतील सॅन होजे हा शहराला हा पुतळा पुणे शहराकडून भेट म्हणून देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेत असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता. या पुतळ्याच्या चोरीमुळे शहरवासीयांना खूप दुःख झाले आहे, असे विभागाने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पुतळ्याचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न काम करत आहोत आणि लवकरच याबद्दल अपडेट देऊ. अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि या कामात नागरिकांची मदत घेतली जात असल्यचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.