योगगुरू रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल..
मुस्लिम समाजाबाबत केलेल्या 'त्या' विधानामुळे अडचणी वाढणार ?
नवी दिल्ली : योग्य गुरु बाबा रामदेव हे आपल्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत असतात.काही दिवसांपूर्वी रामदेव बाबांनी हिंदू मुस्लिम समाजाला उद्देशून केलेल्या एका विधानामुळे त्यांच्या विरोधात थेट तक्रार दखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
एका इंग्रजी वृत्त संस्थेने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. यामुळे बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राम देव बाबा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माची तुलना करत आक्षेपार्ह विधान केले होते. राजस्थानमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमातील हा व्हायरल व्हिडीओ असल्याचे देखील समोर आले. यावरूनच रामदेव बाबा यांच्याविरोधात राजस्थानयामध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्त संस्थेनं प्रसारित केले आहे.
काय म्हणले होते रामदेव बाबा नेमकं
“धर्मांतराच्या बाबतीत मुस्लीम आणि ख्रिश्चन समानच आहेत. मी कुणावरही टीका करत नाहीये. पण काही लोकांना इतर धर्मातून आपल्या धर्मात धर्मांतरीत करण्याची फार ओढ असते तसेच सर्व जातीतील लोकांचा इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावल्याने सर्व पापं धुतली जातात पण, हिंदू धर्मात असं होत नाही असं कुराण आणि बायबलमध्ये लिहलं नाही, मात्र असं सांगितलं जातं” असं रामदेव बाबा म्हणले होते.
रविवारी संध्याकाळी राजस्थान पोलिसांनी रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे समजते. राजस्थानच्या बरमार जिल्ह्यातील चौहतान पोलीस स्थानकात एका स्थानिक नागरिकाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त इंग्रजी वृत्त संस्थेने प्रसारित केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.