माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन..
पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला.
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी पुण्यात केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी साडेनऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.