शिक्षण संस्थांना शिक्षक उपलब्ध होणार.. संस्थाचालकांच्या सांगली अधिवेशनाचा इफेक्ट..!! -रावसाहेब पाटील कोषाध्यक्ष राज्य शिक्षण संस्था महामंडळ
शाळांमध्ये शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त राहिल्याने आहे त्या कमी संख्येच्या शिक्षकावर अध्यापनाचा प्रचंड भार येत होता त्यामुळे मुख्याध्यापकांना फार मोठी डोकेदुखी दुखी झाली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. पवित्र पोर्टल प्रणाली अपयशी ठरल्याने ती रद्द करावी व शिक्षण संस्थांना पूर्ववत शिक्षक भरतीचे अधिकार मिळावेत अशी महामंडळाने अधिवेशनात ठराव करुन मागणी केली होती. हा विषय सध्या न्यायप्रविष्ट असून शंभरहून अधिक संस्था व महामंडळाने मे. हायकोर्टात दाद मागितली आहे. शासनाने तूर्त शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी घेण्याचे वेळापत्रक जाहीर केल्याने शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. संस्था चालक संघटनेच्या पाठपुराव्यामुळे हे झाले आहे. राज्यातील व विशेषकरून सांगली जिल्ह्य़ातील सर्व खासगी शिक्षण संस्थांच्या संस्थाचालक व मुख्याध्यापक यांना चांगलाच दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे पालक वर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे. ''
यावेळी महामंडळाचे कोल्हापूर विभागाचे सेक्रेटरी व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे जाँईट सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे, जिल्हा संघाचे मुख्य प्रवक्ता व कोल्हापूर विभागीय संघटक विनोद पाटोळे, शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन महावीर सौंदत्ते, शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचे संचालक व आटपाडी तालुका शिक्षण संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष अजित चव्हाण, आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे प्रा. एच. यू. पवार व कदम सर आणि संस्थेचे सेवक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.