कंपनीचे 80 कोटी रुपये महिलेने 'या' गोष्टीसाठी उडवले..
नवी दिल्ली : लोक पैशासाठी काय काय करतील याचा काही नेम नाही. पैशांसाठी एखाद्याची फसवणूक करायलाही काही लोक मागे पुढे पाहत नाही. पैशासाठी लोकांनी अनेक विचित्र गोष्टी केल्याचं आत्तापर्यंत समोर आलं आहे. मात्र सध्या समोर आलेल्या घटनेत एका महिलेनं चक्क कंपनीच्या पैशांचा वापर जुगार खेळण्यासाठी केला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
एका महिलेने पार्टी आणि जुगार खेळण्यात कंपनीचे 80 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत. ही महिला पेशाने वकील आहे. फसवणुकीचे हे प्रकरण समोर आल्यानंतर कंपनीला धक्का बसला. कंपनीने महिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंपनीने याविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी महिलेला 20 दिवस दिले आहेत. ही महिला एक वकिल असून तिचं नाव सारा जॅकलीन किंग आहे. ती कॅलिफॉर्नियातील ऑरंज काउंटी येथील रहवासी आहे. ती ब्रिटिश व्हर्जिन आयलंमधील एलडीआर इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये काम करत होती. सारावर तिच्या वैयक्तिक फायद्यासाठी कंपनीच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे.
11 फेब्रुवारी रोजी साराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर करारा भंग, फसवणूक आणि चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एलडीआर इंटरनॅशनल लिमिटेडने दावा केला की सारा लास वेगासला गेली होती. येथे ती एका आलिशान क्लब रिसॉर्टमध्ये राहिली. यादरम्यान ती सतत जुगार खेळत होती. जानेवारीपासून सारावर संशय येण्यास सुरु झाला. कर्जाबाबत तिची चूक समोर आली होती.
LDR इंटरनॅशनल लिमिटेड ने Kind Lending ला 80 कोटी पेक्षा जास्त किमतीची एकूण 97 कर्जे दिली होती. दिलेल्या कर्जात बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, या सर्व खोट्यामागे सारा असल्याचेही समोर आले. साराने स्वतः ही भलीमोठी रक्कम खर्च केल्याचं समोर आलं. आता साराकडे याविषयी उत्तर द्यायला 20 दिवसांचा कालावधी आहे. त्यानंतर सुनावणीची तारीख निश्चित होईल
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.