कणेरी मठ 53 गायींचा तडफडून मृत्यू
एक धक्कादायक बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावरील. कणेरी इथल्या 'सुमंगलम' पंचमहाभूत लोकोत्सवाला गालबोट लावले आहे. मठावरील गोशाळेतील सुमारे 53 गायींचा मृत्यूचा फूड पॉइसनने मृत्यू झाला आहे. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातील शिळ अन्न खायला दिल्यानं गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पशु संवर्धन विभागाकडून दिली आहे.
तब्बल 53 गाईंच्या मृत्यूने कणेरी इथ खळबळ उडाली आहे. इतकच न्हवे तर अजूनही जवळपास 33 गाईची प्रकृती अत्यवस्थ असून 33 गाईंना वाचवसाठी पशुसंवर्धन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.. या सर्व सर्व गाई कणेरी मठावरील गो शाळेतील आहेत. या सुमंगलम कार्यक्रमाला राज्य सरकार देखील प्रयोजक आहेत. हा महोत्सव 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आले आहे. पृथ्वी, पाणी, हवा, तेज, आकाश अशा पंचमहाभूतांवर आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे या सोहळ्याचे स्वरुप आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.