Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाज्योतीकडून एमपीएससीच्या प्रशिक्षणासाठी प्रतीक्षायादीतील 48 विद्यार्थ्यांची निवड

महाज्योतीकडून एमपीएससीच्या  प्रशिक्षणासाठी प्रतीक्षायादीतील 48 विद्यार्थ्यांची निवड


सांगली  :  महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील एकुण १५०० विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. यापैकी 48 जागा या रिक्त होत्या. रिक्त जागा भरण्याकरिता विद्यार्थ्यांनी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांचेकडे मागणी केली होती.  

महाज्योतीने विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घेऊन रिक्त जागा भरण्याकरिता गुणानुक्रमानुसार 48 पात्र उमेदवारांची निवड यादी संकेत स्थळावरती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आनंदाची भावना असून महाज्योतीने न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत, असे  महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापकानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.