Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एका महिन्यात 36 लाख भारतीयांचे Whatsapp बॅन..

एका महिन्यात 36 लाख भारतीयांचे Whatsapp बॅन..


नवी दिल्ली : Whatsapp या सोशल मीडियाच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा उपयोग जगभरातील कोट्यवधी यूझर्ज करतात. प्रामुख्याने Whatsapp चा उपयोग हा चॅटिंग आणि मेसेजिंगसाठी करण्यात येतो. मात्र यासाठी Whatsapp चे काही नियम आणि मार्गदर्शक सूचनाही आहेत. या नियमांचा कुणी भंग केला तर असे अकाऊंटस Whatsapp नियंत्रित करत असलेल्या कंपनीकडून बंद करण्यात येताय. आता समोर आलेली धक्कादायक माहिती म्हणजे गेल्या महिनाभरात Whatsapp नं भारतातील 36 लाखांपेक्षा जास्त जणांचं Whatsapp बंद केलेलं आहे. कंपनीनं जाहीर केलेल्या एका अहवालात ही बाब समोर आलीय. 

का होतात Whatsapp अकाऊंट बंद ?

Whatsapp ची मालकी मेटा या कंपनीकडं आहे. नियमाप्रमाणे दर महिन्याला या कंपनीला त्यांचा अहवाल सादर करावा लागतो. या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे की, Whatsapp चा चुकीचा वापर करणाऱ्या अकाऊंटसवर दरवेळी कारवाई करण्यात येते. जगभरातील माहिती असलेल्या या अहवालात ज्या मोबाईल नंबरच्या पुढे (+91) आहे त्यांचे नंबर्स हे भारतीय आहेत, हे लगेच समोर येते. भारतात Whatsapp चे 40 कोटींहून जास्त युझर्स आहेत.

रिपोर्टमध्ये समोर आला हा आकडा

डिसेंबर महिन्यात कंपनीनं दिलेल्या अहवालात लिहिण्यात आले आहे की, 1 डिसेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या काळात Whatsapp नंबरातील 36,77,000 अकाऊंटस बंद केले आहेत. यातील 13,89,000 अकाऊंट्स हे प्रो एक्टिव्ह पद्धतीनं म्हणजे युझर्सनं रिपोर्ट, तक्रार दिल्याशिवायच बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. म्हणजेच कोणत्याही तक्रारीविना ही कारवाई करण्याता आली आहे.

किती युझर्सनी कंपनीकडे केली होती तक्रार डिसेंबर महिन्यात Whatsapp कंपनीला युझर्सकडून 1607 तक्रारी आल्या होत्या. यात चौकशी केल्यानंतर 166 तक्रारींवर कारवाई करण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलंय. 2021 च्या आयटी नियमांनुसार 50 लाखांपेक्षा जास्त युझरबेस असणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्मसना आणि कंपन्यांना दरमहा कंप्लायम्स रिपोर्ट प्रसिद्ध करावा लागतो. यात कोणत्या तक्रारींवर काय कारवाई झाली हेही सांगावे लागते. कोणत्या चुका केल्यास अकाऊंट होऊ शकते बंद.

Whatsapp अकाऊंट बंद होण्याचं सर्वात मोठं कारण हे स्पॅम मेसेजिंग हे आहे. म्हणजे तुमच्या Whatsapp च्या अकाऊंटवरुन जर तुम्ही स्पॅम मेसेज पाठवून, इतरांना त्रास दिलात तर तुमचं अकाऊंट बंद होऊ शकतं. तसचं वर्णद्वेषी, धार्मिक, हिंसा भडकवणारी, अफवांना उत्तेजन देणाऱ्या पोस्टमुळंही तुमचं Whatsapp अकाऊंट बंद होण्याची शक्यता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.