Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्मृती मंधानावर धनाचा वर्षाव, स्मृतीवर 3.40 कोटींची बोली

स्मृती मंधानावर धनाचा वर्षाव, स्मृतीवर 3.40 कोटींची बोली


बहुप्रतीक्षित, बहुचर्चित महिला प्रीमियर लीगचा लिलाव सुरू होताच खेळाडूंवर धनधनाधन वर्षाव सुरू झाला. भारतीय महिला क्रिकेटची सुपरस्टार फलंदाज आणि लेडी विराट असलेल्या स्मृती मंधानावर सर्वोच्च 3.40 कोटी रुपयांची बोली लावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तिला आपल्या संघात सर्वप्रथम स्थान दिले. परदेशी खेळाडूंमध्ये अॅशले गार्डनर सर्वात महागडी ठरली. तिच्यासाठी गुजरात जायंट्सने 3.20 कोटी इतकी किंमत मोजली.

आरसीबीची अर्धी रक्कम तीन खेळाडूंवरच खर्च स्मृती मंधानाला 3.40 कोटींवर आपल्या संघात घेतल्यानंतर सोफी डिवाइन (50 लाख) आणि एलिस पेरीसाठी (1.70 कोटी) आपल्या 12 कोटींपैकी सुमारे अर्धी रक्कम खर्च केली. या तिघींसाठीच त्यांनी 5 कोटी 60 लाख रुपये मोजले. मंधानासाठी मुंबई इंडियन्सने शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण अपयश आल्यानंतर त्यांनी तिची कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या हरमनप्रीत कौरला त्यांनी 1.8 कोटींवर आपल्या संघात घेतले. हरमनसाठी आरसीबी आणि दिल्ली पॅपिटल्सनेही चांगली बोली लावली होती. तसेच मुंबई इंडियन्सने अष्टपैलू पूजा वस्त्र्ाकार (1.9 कोटी) आणि यास्तिका भाटिया (1.5 कोटी) यांनाही आपल्या संघात घेतले.

गार्डनर, नॅट शिवर सर्वात महागडय़ा विदेशी

महिला टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू असलेल्या अॅशले गार्डनरला 3.20 कोटींच्या बोलीवर गुजराज जायंट्सने आपल्या संघात घेतले. ती सर्वाधिक किंमत लाभलेली परदेशी खेळाडू ठरली. तिच्यापाठोपाठ नॅट-शिवर ब्रंटसाठी मुंबईनेही तितकीच रक्कम खर्च केली. इंग्लिश फिरकी गोलंदाज सोफी एकलस्टोनला यूपी वॉरियर्सने 1.8 कोटींवर जिंकले तर बॅथ मूनीसाठी गुजराज जायंट्सने 2 कोटी रुपयांइतकी मोठी रक्कम दिली.

मंधानासाठी जोरदार चुरस

महिला प्रीमियर लीगच्या खेळाडूंचा लिलाव सुरू होताच सर्वात पहिले नाव स्मृती मंधानाचे पुकारले गेले. 50 लाख मूळ किंमत असलेल्या मंधानावर लावलेली बोली जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. अखेर 3.40 कोटी रुपयांवर ही बोली थांबली आणि ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची झाली. आपल्याला मिळालेल्या कोटींची किंमत पाहून स्मृतीच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहत होता. तिला मिळालेल्या किमतीचा तिच्या संघसहकाऱयांनी आनंदोत्सव साजरा केला. सध्या स्मृती भारतीय संघाबरोबर टी-20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेत आहे.

खर्च केले इतके रुपये

मुंबई इंडियन्स 17 खेळाडूंसाठी 12 कोटी रुपये खर्च

दिल्ली पॅपिटल्स 18 खेळाडूंसाठी 11.65 कोटी रुपये

आरसीबी 18 खेळाडूंसाठी 11.90 कोटी रुपये

यूपी वॉरिअर्स 16 खेळाडूंसाठी 12 कोटी रुपये

गुजरात जायंट्स 18 खेळाडूंसाठी 11.95 कोटी रुपये

दहा महागडे खेळाडू

स्मृती मंधाना (आरसीबी) 3.40 कोटी रु.

अॅशले गार्डनर (गुजरात) 3.22 कोटी रु.

नताली शिवर-ब्रंट (मुंबई) 3.22 कोटी रु.

दीप्ती शर्मा (यूपी) 2.61 कोटी रु.

जेमीमा रॉड्रिग्ज (दिल्ली) 2.21 कोटी रु.

बेथ मूनी (गुजरात) 2 कोटी रु.

शेफाली वर्मा (दिल्ली) 2 कोटी रु.

पूजा वस्त्र्ााकर (मुंबई) 1.92 कोटी रु.

रिचा घोष (आरसीबी) 1.92 कोटी रु.

सोफी एकलस्टोन (यूपी) 1.82 कोटा रु.

जगज्जेत्या संघातील सहा जणी खेळणार लीग

19 वर्षांखालील मुलींच्या पहिल्यावहिल्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या सहा भारतीय खेळाडू पहिल्या महिलांच्या लीगमध्ये खेळणार आहेत. आज झालेल्या लिलावात यूपीने श्वेता सेहरावतला 40 लाखांत, पार्शवी चोप्रा आणि यशश्रीला दहा-दहा लाखांत घेतले. दिल्लीने वेगवान गोलंदाज तितास साधूला 25 लाखांत तर मुंबईने सोनम यादवला 10 लाखांत आणि गुजरातने शबनम शकीलला 10 लाखांत आपल्या संघात घेतले.

असे असतील डब्ल्यूपीएल संघ

दिल्ली पॅपिटल्स:- 

जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, जसिया अख्तर, मिन्नू मानी, पूनम यादव, जेस जोनासेन, स्नेहा दीप्ती, अरुंधती रेड्डी, राधा यादव, अर्पणा मंडल, तानिया भाटिया, शिखा पांडे, तितास साधू (सर्व भारतीय), मेग लेनिंग (ऑस्ट्रेलिया), मारिजन पॅप (दक्षिण आफ्रिका), एलिस केप्सी (इंग्लंड), ग्रेस हॅरिस (ऑस्ट्रेलिया).

मुंबई इंडियन्स:-

हरमनप्रीत कौर हुमायरा काझी, प्रियंका बाला, सोनम यादव, पूनम खेमनार, जिंतीमनी कलिता, नीलम बीश्त, यस्तिका भाटिया, पूजा वस्त्र्ााकर, अमनजोत कौर, धारा गुज्जर, साइका इशाक (भारतीय), नेटली सीवर (इंग्लंड), अमीलिया केर (न्यूझीलंड), हीथर ग्राम (ऑस्ट्रेलिया), इजाबेल वाँग (इंग्लंड), हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडीज), क्लो ट्रयॉन (द. आफ्रिका)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:-

स्मृती मंधाना, रेणुका सिंह, रिचा घोष, दिशा कसट, इंद्राणी रॉय, श्रेयंका पाटील, कनिका आहूजा, आशा शोभना, प्रीती बोस, पूनम खैरनार, कोमल जांजड, सहाना पवार (सर्व भारतीय), सोफी डिवाइन (न्यूझीलंड), एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया), एरिन बर्न्स (ऑस्ट्रेलिया), हीथर नाइट (इंग्लंड), डेन वेन निकर्क (द. आफ्रिका), मीगन शट (ऑस्ट्रेलिया).

यूपी वॉरियर्ज:-

दीप्ती शर्मा, अंजली सर्वनी, राजेश्वरी गायकवाड, लक्ष्मी यादव, सिमरन शेख, पार्शवी चोप्रा, एस. यशश्री, श्वेता सहरावत, किरण नवगिरे, देविका वैद्य (सर्व भारतीय) ताहिलीया मॅग्रा (ऑस्ट्रेलिया), शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका), सोफी एकलस्टोन (इंग्लंड), एलीसा हिली (ऑस्ट्रेलिया), ग्रेस हॅरिस (ऑस्ट्रेलिया), लॉरेन बैल (इंग्लंड).

गुजरात जायंट्स:- 

हरलीन देओल, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा पंवर, सुषमा वर्मा, हर्ले गाला, अश्वनी कुमारी, पारुनिका सिसोदिया, शबनम शकील, स्नेह राणा (सर्व भारतीय), अॅश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया), सोफिया डंकली (इंग्लंड), एनाबेल सदरलॅण्ड (ऑस्ट्रेलिया), डेओंड्रा डॉटिन (वेस्टइंडीज), सबिनेनी मेघना (भारतीय), जॉर्जिया वेयरहम (ऑस्ट्रेलिया).


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.