Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नसमारंभात अग्नितांडव : 3 मुलांसह 14 जणांचा होरपळून मृत्यू

लग्नसमारंभात अग्नितांडव : 3 मुलांसह 14 जणांचा होरपळून मृत्यू


लग्नसमारंभात अनेकदा भीषण अशा दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना झारखंडमधील धनबादमध्ये घडली आहे. येथील धनबादमध्ये एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याने यामध्ये आतापर्यंत 3 लहान मुलांसह 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

दुर्दैवी दुर्घटनेमध्ये 12 जण जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, झारखंडमधील धनबादमध्ये एका कुटूंबात लग्न समारंभ असल्याने वर्दळ होती. यावेळी लग्न समारंभादरम्यान येथील आशीर्वाद टॉवरमध्ये एका अपार्टमेंटला आग लागली. आग लागताच एकच गोंधळ उडून गेला. यावेळी या माहिती तात्काळ स्थानिक पोलीसांना देण्यात आली. आगीची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच बचावकार्य सुरू केले. तसेच आगीमध्ये जखमी झालेल्याना व मृत्युमुखी पडलेल्याना रुग्णालयात हलवण्यात आले.

जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली आहे. रात्री 11 च्या सुमारास घडल्याने पोलिसांसह अग्निशमन विभागाची एकच धांदल उडाली होती. आगीमध्ये 3 आणि दुसरा मजला भक्षस्थानी सापडला. आगीचा भडका उडाल्यामुळे अनेक जण अडकून पडले होते. या आगीमध्ये 3 लहान मुलांसह एकूण 12 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.