2024 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत! प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काय होईल याचा अंदाज त्यांनी बांधला आहे. ते म्हणाले, मुसलमांनांची साथ मिळाली तर नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येणार नाहीत. पंतप्रधान होणार नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे. तसेच इतर समाजाची संख्या कमी आहे. त्यामुळे बदलाची लाट मुस्लिमांकडून आली पाहिजे. मुसलमानांकडून बदलाची लाट आली तर 2024 मध्ये देशात बदल होईल. त्यामुळे तुम्हा सर्वांना एकत्र याव लागणार आहे, असेही ते म्हणाले.
कर्नाटकाचा निकाल विरोधात गेल्यावर भाजप देशातील माहौल बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतो. मुस्लिमांकडे पॉलिटिकल लीडरशीप नाही. तरीही मुस्लिमांनी एकत्र आलं पाहिजे. कारण आज आपण पुन्हा 1947च्या परिस्थितीत आलो आहोत. देशात बऱ्याच ठिकाणी चर्चा सुरू आहेत. तेलंगनाच्या मुख्यमंत्र्यांनी त्याची सुरुवात केली आहे. आता केजरीवाल चर्चा करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी माझी जेव्हा भेट झाली होती, तेव्हा त्यांनी म्हटले होत.
केंद्र सरकारचा राज्य शासनात हस्तक्षेप वाढल्याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना झाली आहे. यामुळे जोपर्यंत आपण आपल्या चुका मान्य करणार नाही तोपर्यंत आपल्याला मार्ग सापडणार नाही. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालावर आम्ही काही करू शकत नाही. असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचं हे मत संविधानाला धरून नाही, असे मला वाटत, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आंबेडकर यांनी ठाकरे गटाशी युतीची घोषणा केली आहे. मात्र महाविकास आघाडीत ते अजूनही आलेले नाहीत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.