Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च 2023 परीक्षेस पूर्वीप्रमाणे दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देणेबाबत

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च 2023 परीक्षेस पूर्वीप्रमाणे दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देणेबाबत


महाराष्ट्रामध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (ता दहावी च्या लेखी परीक्षा माहे फेब्रुवारी आणि माहे मार्चपासून सुरू होत आहेत. या परीक्षेच्या वर सचिव राज्य मंडळ पुणे यांनी वरीत संदर्भात प्रकटन जाहीर केलेले आहे. या प्रकटनाप्रमाणे इयत्ता दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी मार्च 2023 च्या परीक्षेपासून प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. तसे वाटप न करता सकाळी 11 वाजता व दुपारच्या सत्रात दुपारी तीन वाजता परीक्षा दालनात प्रपत्र वितरण करण्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. सदरचे परीक्षेच्या तोंडावर राज्य मंडळांनी जाहीर केलेले धोरण विद्यार्थी हिताच्या विरुद्ध त्यांचे मानसिकतेच्या विचार न करता कपोलकल्पित खोटी करणे नमूद करून सदरचा निर्णय जाहीर केला आहे.

सदरचा निर्णय ताबडतोबीने रद्द करून पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षा वेळेपूर्वी दहा मिनिटे प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात यावे अशी मागणी सांगली जिल्हा शिक्षण संस्थांच्या संघाच्या बैठकीत सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे या बैठकीत महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य, ऍड अजित भगवानराव सूर्यवंशी व इतर मान्यवर आणि पालक उपस्थित होते राज्य मंडळाचे धोरण विद्यार्थ्यांच्यावरच खोटे आक्षेप घेऊन जाहीर केलेले आहे. 

कोणताही परीक्षार्थी प्रश्नपत्रिका मोबाईलवर अथवा अन्य समाज माध्यमातून व्हायरल करीत नाही अशा परिस्थितीत प्रकटनांमध्ये दुसऱ्या परिच्छेदामध्ये "परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत, इयत्ता दहावी व बारावी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षा कडे बारकाईने लक्ष असते. पेपर फुटीच्या अशा अफवामुळे परीक्षार्थी च्या मनात संभ्रम निर्माण होतो तसेच यामुळे मंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होते. यापूर्वी परीक्षा दालनात परीक्षार्थीना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वितरण केल्यामुळे परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेनंतर पोचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये प्रश्नपत्रिका चा आशय आढळून आल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत" असे नमूद केले आहे

या संबंधात दहा मिनिटांच्या काळात प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा आणि काही अंशी घटना निदर्शनास आल्याचे नमूद करून केलेले प्रकटन निकालास खोटे आणि सामान्यांनाही न पटणारे असे आहे. परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेत न पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसूच दिले जाऊ नये असे परिपत्रक या अगोदरच प्रसिद्ध केले असल्यामुळे हे विद्यार्थी मोबाईलवर असे समजून घेतात असे आढळून आल्याचे प्रकटनामधील कथन ही न पटणारे आहे.

एकूणच राज्य मंडळांनी जाहीर केलेले प्रकटन कुठलेही ठोस कारण नसताना, मोघम कारणे नमूद करून विद्यार्थ्यावर जाणून बुजून अन्याय करणारे, त्यांचे मानसिक खच्चीकरण करणारे , शैक्षणिक नुकसान करणारे असल्याचे सदर प्रकटन परीक्षा तोंडावर असताना जाहीर केलेले आहे. प्रश्नपत्रिका फुटीसाठी जबाबदार असणाऱ्या वर राज्य मंडळांनी कार्यवाही करण्याची यंत्रणा उभी केली आहे तीच यास जबाबदार आहे किंवा गैरप्रकार रोखण्यास असमर्थ आहे. विद्यार्थी दुरान्वये पेपर फुटीस जबाबदार नाहीत याचा गांभीर्याने विचार बोडनि केलेला नाही.

अशा परिस्थितीत राज्य मंडळाचा निर्णय चुकीचाच आहे सदरचा निर्णय ताबडतोबीने मागे घेण्यात यावा आणि आज परीक्षेच्या वेळेआधी दहा मिनिटे पेपर विद्यार्थ्यांना देण्यात येतो तसा तो देण्यात यावा अशी ही मागणी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या बैठकीत सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या विषयी तातडीने दखल घेऊन त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या पदाधिकारी शिक्षक पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.