Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका पाठविण्यास 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका पाठविण्यास 8 मार्चपर्यंत मुदतवाढ


सांगली दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी  ते 31 डिसेंबर 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि प्रवेशिका पाठविण्यास 8 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, सांगली येथे संपर्क साधावा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.