Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुर्की आणि सीरीयाच्या सीमेवर 14 दिवसानंतर आणखी एक भूकंप..

तुर्की आणि सीरीयाच्या सीमेवर 14 दिवसानंतर आणखी एक भूकंप..


तुर्की आणि सीरीया पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तुर्की आणि सीरीया देशाच्या सीमेवर आणखी एक भूकंप झाला आहे. हा भूकंप 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती समोर आली आहे. तुर्कीच्या हाते प्रांतात भूकंपाचे धक्के बसले. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी आहेत. भूकंप झालेल्या ठिकाणी मदतकार्य सुरू असून मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

दोन लाख घरांचे काम तातडीने सुरू करणार

अनादोलु एजेन्सीने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या हाते प्रांतात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाला असून 213 जण जखमी झाले आहे. राष्ट्रपती रेसेप तईप एर्दोगन यांनी सोमवारी हाते प्रांताचा दौरा केला. सरकार पुढील महिन्यात भूकंपग्रस्त भागात जवळपास दोन लाख घरांचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

14 दिवसांनतर पुन्हा भूकंपाचे धक्के

14 दिवसांनतर आलेल्या या भूकंपामध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत. भूकंपानंतर मदत आणि बचाव पथकाने भूंकपग्रस्त भागाकडे धाव घेतली असून अजूनही बचावकार्य सुरू आहे. 14 दिवसांपूर्वी जेव्हा भूकंप आला त्यावेळी अनेक इमारतींना तडे गेले होते. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, दोन्ही देशातील शेकडो इमारती कोसळल्या होत्या. अनेकजणांची कुटुंब रस्त्यावर आली आहेत. काहींची घरं जमीनदोस्त झाली तर अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला. अशा इमारतींना धोकादायक इमारती म्हणून घोषीत केले होते. धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना रिलीफ कॅम्पमध्ये पाठवण्यात आले.

भारतासह इतर 84 देशांच्या पथकांकडून बचावकार्य सुरू

6 फेब्रुवारी रोजी तुर्कीए आणि सीरियामध्ये मोठा भूकंप आला. याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. भूकंपानंतर सुमारे 100 हून अधिक आफ्टर शॉक बसले. भूकंपग्रस्त भागात मदतीसाठी भारताने NDRF पथकाला तुर्कीमध्ये पाठवलं. भारतासह इतर 84 देशांच्या बचाव पथकांकडून तुर्की आणि सीरियामध्ये बचावकार्य सुरू आहे. जगभरातून तुर्की आणि सीरियाला मदत दिली जात आहे. तुर्कीए आणि सीरियातील भूंकपग्रस्त शहर पुन्हा नव्याने उभी करण्याचे आव्हान तुर्कीए सरकारसमोर आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.