Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'या' 13 कोटी लोकांचं पॅनकार्ड होऊ शकतं बंद..

'या' 13 कोटी लोकांचं पॅनकार्ड होऊ शकतं बंद..


पॅनकार्ड वापरणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, सरकार 13 कोटींहून अधिक लोकांचे पॅन कार्ड रद्द करू शकते. CBDT ने सांगितले आहे की, 61 कोटी पॅन कार्ड यूझर्सपैकी 48 कोटी लोकांनी ते त्यांच्या आधार कार्डशी लिंक केले आहे. त्याच वेळी, 13 कोटी लोकांनी अद्याप त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही..

CBDT ने म्हटले की...

सीबीडीटीने सांगितले आहे की, जर 31 मार्चपर्यंत हे केले नाही तर त्यांना व्यवसाय आणि कर संबंधित कामांमध्ये लाभ मिळू शकणार नाहीत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, आतापर्यंत अनेक कोटी पॅन आधारशी जोडलेले नाहीत, परंतु हे काम 31 मार्च अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

पॅन कार्ड होईल निरुपयोगी

केंद्र सरकारने पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. यासाठी 31 मार्च 2023 ची अंतिम मुदत ठरवली आहे. आधारशी लिंक नसलेले वैयक्तिक पॅन या तारखेनंतर निष्क्रिय घोषित केले जातील असे सांगण्यात आलेय. यासोबतच सरकारने म्हटले आहे की, सध्यापासून 31 मार्चपर्यंत पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल.

मिळणार नाही टॅक्सचा फायदा

CBDT प्रमुखांनी म्हटले की, पॅनला आधारशी लिंक करण्याबाबत अनेक जागरुकता मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. आम्ही ही मुदत अनेक वेळा वाढवली देखील आहे. जर आधार हे ठरवलेल्या वेळेपर्यंत पॅनशी लिंक केले नाही, तर त्या धारकाला कर सवलती मिळू शकणार नाहीत. कारण त्याचा पॅन मार्चनंतर वैध राहणार नाही.

पॅन कार्ड आधारशी कसे लिंक करावं -

* यासाठी सर्वप्रथम इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

* यानंतर, तुम्हाला डाव्या बाजूला Quick सेक्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

* नवीन विंडोवर तुमचा आधार डिटेल्स, पॅन आणि मोबाइल नंबर टाका.

* 'I validate my Aadhar details' या पर्यायावर क्लिक करा.

* तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर OTP पाठवला जाईल, तो यामध्ये करा आणि सबमिट करा.

* दंड भरल्यानंतर तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.