Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देशात XBB व्हेरियंटचे सात रुग्ण, 228 नवे रुग्ण..

देशात XBB व्हेरियंटचे सात रुग्ण, 228 नवे रुग्ण..


देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज देशात 288 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात XBB व्हेरियंटचे दोन नवे रुग्ण आढळले असून आता देशात XBB व्हेरियंटचे सात रुग्ण आहेत. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2503 वर पोहोचली आहे. काल देशात 188 रुग्ण आढळले होते, आज 288 रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्येत 100 रुग्णांची वाढ झाली आहे.

देशातील XBB.1.5 व्हेरियंट रुग्णांची संख्या सातवर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात XBB.1.5 व्हेरियंटचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील XBB व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 7 वर पोहोचली आहे. गुरुवारी INSACOG च्या आकडेवारीनुसार, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये XBB व्हेरियंटच्या नवीन दोन रुग्णांची नोद झाली आहे. तर गुजरातमध्ये तीन आणि कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

देशात XBB आणि BF.7 व्हेरियंटचे रुग्ण किती?

ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटमुळे अमेरिका आणि चीनमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगभरात ओमायक्रॉनच्या एक्सबीबी.1.5 (XBB 1.5 Variant) व्हेरियंट आणि बीएफ.7 व्हेरियंटचा (BF.7 Variant) उद्रेक पाहायला मिळत आहे. या व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतात बीएफ.7 व्हेरियंटचे सात (BF.7 Variant) आणि एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे (XBB 1.5 Variant) पाच रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत असले, तरी येथील परिस्थिती दिलासादायक आहे.

220 कोटीहून अधिक लसीकरणाचा टप्पा पूर्ण

देशात आतापर्यंत 220 कोटीहून अधिक लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. सरकार लसीकरणावर अधिक भर देत आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना लसीकरण आणि बूस्टर डोस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे.

चीनमध्ये कोरोनाचा कहर

एशिया टाइम्सने हेल्थ एक्सपर्ट्स रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यामध्ये चीनमध्ये सुमारे 40 टक्के नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. चीनमधील महामारी विशेष तज्ज्ञ झेंग गुआंग यांनी माहिती देत सांगितले की, चीनमधील आतापर्यंत अनेक शहरांमध्ये 50 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात चीनमधील सुमारे 40 टक्के लोकसंख्या कोरोना संक्रमित झाली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.