IBM कंपनीनं तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना दिला नारळ
मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉननंतर आता IBM या कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. IBM ने तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना बुधुवारी काढून टाकले आहे. वार्षिक रोखीचे लक्ष्य गाठण्यात कंपनी अपयशी ठरली आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी जेम्स कॅव्हानो यांनी दिली. रॉयटर्सने याबाबतची माहिती दिली आहे.
आर्थिक मंदिचा मोठा फटका
देशातील सर्वच कंपन्यांना आर्थिक मंदिचा फटका बसत आहे. सातत्यानं कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहेत. नुकतेच मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉन, स्विगी शेअर चॅट या कंपन्यानी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते. त्यानंतर आता IBM ने देखील आता 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे. आर्थिक मंदीचा मोठा फटका कंपन्यांना बसत आहे. त्यामुळं गुंतवणूकदार खर्च कपात करत आहेत. विविध देशातील अनेक दिग्गज कंपन्यांच्या नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन कंपन्या जागतिक आर्थिक मंदीला सोमोरं जात आहेत. त्यामुळं कंपन्या खर्चात कपात करत आहेत.
जगातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने 10,000 कर्मचार्यांची कपात केली आहे. कंपनीने आपल्या नियामक फायलिंगमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. या कर्मचाऱ्यांना कंपनीने तत्काळ काम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आर्थिक परिस्थिती आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतीमुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली जात असल्याचे कंपनीने सांगितले. आपल्या हार्डवेअर पोर्टफोलिओमध्ये देखील बदल करणार आहेत आणि भाडेतत्त्वावर दिलेली कार्यालये एकत्र करणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की कंपनी आपली अनेक कार्यालये बंद करण्याची तयारी करत आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला म्हणाले की, ही कपात आमच्या एकूण कर्मचार्यांपैकी 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
आम्ही काही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची कपात करत असलो तरी महत्त्वाच्या धोरणात्मक क्षेत्रात आम्ही भरती करणे सुरू ठेवू. गेल्या काही दिवसापूर्वी ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉनने देखील मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली होती. अॅमेझॉन आपल्या 18,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून टाकले होते. याबाबतची माहिती खुद्द ॲमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अँडी जॅसी यांनी दिली होती. तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदीचा फटका ॲमेझॉन कंपनीला बसला होता. कोविड 19 काळात अॅमेझॉनने मोठ्या संख्येने लोकांची भरती करुन त्यांना कामावर ठेवले होते. परंतू, कंपनीला आता आपला हाच निर्णय जड जात होता. त्यामुळेच कंपनी नोकरकपात करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. 18 हजार कर्मचार्यांची कपातीचा अर्थ असा आहे की कंपनी 70 टक्के नोकऱ्या कमी करण्याचा विचार करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.