Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या घरावर FBIचे छापे, १३ तास झडती

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या घरावर FBIचे छापे, १३ तास झडती


वॉशिंग्टन : अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांच्या विल्मिंग्टन येथील निवासस्थानी १३ तास झडती घेतली. या ठिकाणाहून त्यांनी काही गोपनीय दस्तऐवज जप्त केले आहेत. एफबीआयने बायडेन यांच्या काही हस्तलिखित नोट्सही ताब्यात घेतल्या आहेत. अध्यक्षांचे वकील बॉब बाउर यांनी ही माहिती दिली. बायडेन यांनी स्वेच्छेने एफबीआयला निवासस्थानी झडती घेण्याची परवानगी दिली. मात्र, वॉरंट नसतानाही घडलेली ही घटना असामान्य आहे.

बायडेन हे पुन्हा निवडणुकीसाठी आपला दावा करण्याच्या तयारीत असताना एफबीआयने केलेली झडती बायडेन यांच्यासाठी अडचणीची ठरली आहे. साधारणत: गोपनीय दस्तऐवज जास्तीत जास्त २५ वर्षांनी सार्वजनिक केले जातात. परंतु, काही नोंदी जास्त काळ गोपनीय ठेवल्या जातात. बायडेन यांनी १९७३ ते २००९ या काळात सिनेटर म्हणून काम केले आहे.

उपाध्यक्षपदाच्या काळातील कागदपत्रे

बायडेन यांच्या निवासस्थानात आणि खासगी कार्यालयांमध्ये सापडलेल्या एकूण गोपनीय कागदपत्रांची संख्या आता सुमारे दीड डझन झाली आहे. ही सर्व कागदपत्रे २००९ ते २०१६ या काळात त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहेत. ही कागदपत्रे आता फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या ताब्यात आहेत. बायडेन यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे चुकीच्या ठिकाणी असल्याचे आम्हाला आढळले, त्यामुळे आम्ही ते तत्काळ न्याय विभागाकडे सोपविले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.