Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाशिकच्या राज्यस्तरीय संगीत स्पर्धेत आर आय टी कॉलेज चे उज्वल यश..

नाशिकच्या राज्यस्तरीय संगीत स्पर्धेत आर आय टी कॉलेज चे उज्वल यश..


गायन स्पर्धेत साक्षी हेब्बाळकर प्रथम ,पाश्चात्य एकल गायन स्पर्धेत सार्थक पाचपांडे द्वितीय ,तर समूहगीत स्पर्धेत तृतीय

सांगली: नाशिक येथील महिलारत्न पुष्पाताई हिरे कला वाणिज्य व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन संगीत स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूरच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपशास्त्रीय गायन ,समूहगीत आणि पाश्चात्य गायन या तीनही प्रकारात बक्षीस मिळवत उज्वल यश मिळवले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महिला रत्न पुष्पाताई हिरे कला विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय संगीत विभाग मालेगाव जिल्हा नाशिक यांच्यावतीने महिलारत्न पुष्पाताई हिरे राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शास्त्रीय उपशास्त्रीय सुगम समूहगीत पाश्चात्य गायन या विभागात मिळून महाराष्ट्रातील साठ महाविद्यालयातील सुमारे 200हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेत इस्लामपूरच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध संगीत स्पर्धेत उज्वल यश मिळवले यात उपशास्त्रीय विभागात कुमारी साक्षी हेब्बाळकर (नाट्यगीत) हिने  7001रुपये,स्मृतीचिन्ह, गौरव प्रमाणपत्र मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर पाश्चात्य एकल गायन स्पर्धेत सार्थक पाचपांडे याने 5001रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला तर समूह गायन स्पर्धेत साक्षी हेबाळकर, श्रेयश सानप ,अनिकेत आगावणे, कृष्णा सानप, सर्वेशा पाठक ,राजवर्धन शिंदे अक्षता सवदीकर ,गंधार जाधव, शोहेब मुलानी, विशाल खवरे, सार्थक पाचपांडे यांनी 2001 रुपये, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र मिळवत तृतीय क्रमांक मिळवला .या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रख्यात ज्येष्ठ गायक पंडित आनंद भाटे यांच्या हस्ते झाला . कैलास सांवत यांनी या समुहगीताला संगीत दिले.  

यावेळी संपदा हिरे, अपूर्व हिरे आदी मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून ज्ञानेश्वर कासार आशिष रानडे यांनी काम पाहिले. या विद्यार्थी विद्यार्थिनींना आर आय टी कॉलेजच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डिन स्टुडन्ट डेव्हलपमेंट डॉ.एल.एम. जुगुळकर ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सचिन पाटील प्रा. श्रीकांत कारंजकर,डॉ.संदीप पाटील, प्रा.पी.एम.जाधव आदी मान्यवरांचे प्रोत्साहन लाभले, तर प्रा. अक्षय कुलकर्णी यांचे या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.