Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिल्लीहून पुण्याकडं जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन

दिल्लीहून पुण्याकडं जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन


नवी दिल्ली : विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती होती. ही माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. दरम्यान बॉम्बच्या अफवेने चांगलीच खळबळ उडाली. सर्व बाबी तपासल्यावर विमानाचे उड्डाण झाले.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, उड्डाण करण्यापूर्वी स्पाईसजेटच्या दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. यानंतरसीआयएसएफ आणि दिल्ली पोलिस अलर्टवर आहेत. दिल्ली विमानतळावर विमानाची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. परंतु SOP नुसार सुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे.

या सूचनेनंतर निमलष्करी दल CISF आणि दिल्ली पोलीस सज्ज आहेत. याआधी सोमवार, 9 जानेवारीला विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. गुजरातच्या जामनगर विमानतळावर मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या 'अझूर एअर'च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मात्र, झडतीनंतर विमानात काहीही संशयास्पद आढळले नाही, त्यानंतर मंगळवारी दुपारी हे विमान गुजरातहून गोव्यात पोहोचले. अधिकाऱ्यांनी सांगितले की विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर एनएसजी आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी शोध घेतला, ज्यामध्ये काहीही संशयास्पद सापडले नाही. या विमानात 236 प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्स होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.