पृथ्वीराज पाटील यांच्या प्रयत्नातून अहिल्यादेवी चौक ते सुंदर पार्क रस्त्याच्या कामाचे डांबरीकरण सुरू
सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते सुंदर पार्क सांगली या ४५ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे डांबरीकरणाचा शुभारंभ सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील, यांच्या हस्ते महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज समारंभपूर्वक झाला.
नगरविकास विभाग यांच्याकडे पृथ्वीराज पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झालेल्या १० कोटी रकमेतील अंदाजे ४५ लाख रुपये रक्कमेचे हे काम आहे. यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, उपनगरातील रस्ते चांगले व दर्जेदार व्हावेत, यासाठी नेहमीच आम्ही प्राधान्य दिले आहे. वाढत्या शहरीकरणामध्ये चांगले रस्ते महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. यापुढेही रस्ते विकासाबरोबरच शहर विकासाच्या इतर बाबींवर जाणीवपूर्वक लक्ष देऊ.
नगरसेवक संतोष पाटील, अल्ताफ पेंढारी, यांनी या कामाकरीता पाठपुरावा केला. या वेळी नगरसेवक मनगु सरगर, नगरसेविका रोहिणी पाटील, मदीना बारूदवाले, इलही बारुद वाले, बी एस पाटील, प्रताप चव्हाण, आशीष चौधरी, राजू कलाल, पैगंबर शेख, मौला वंटमुरे तसेच परिसरातील नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.