Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मानसिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि राजकारण.' ऑलिम्पिक पदक विजेत्यांनी सांगितला अनुभव

'मानसिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि राजकारण.' ऑलिम्पिक पदक विजेत्यांनी सांगितला अनुभव


आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरोधात आघाडी उघडली आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये देशाला पदक मिळवून देणाऱ्या विनेश फोगटने WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की अनेक प्रशिक्षक आणि अगदी WFI अध्यक्षांनी राष्ट्रीय शिबिरांमध्ये महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केले. आता खेळाडू कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. अशात देशासाठी पदक जिंकणारे खेळाडू इतके असहाय्य का झाले हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकणारा बजरंग पुनिया आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी साक्षी मलिक यांनीही विनेश फोगटला पाठिंबा दिला आहे. आपले दु:ख व्यक्त करताना विनेश म्हणाली, “टोकियो ऑलिम्पिकनंतर मला फेडरेशन आणि ब्रिजभूषण सिंग यांनी देशद्रोही ठरवले. अध्यक्ष म्हणाले की, मी खोटे नाणे आहे. संपूर्ण देशाला त्याचा अर्थ माहित आहे.”

विनेश पुढे म्हणाली, “टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभूत झालेल्या खेळाडूंचा मानसिक छळ करण्यात आला. त्यावेळी जे प्रशिक्षक होते त्यांना कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडण्यात आले… माझ्या विरोधात चुकीच्या गोष्टी लिहिल्या गेल्या आणि मी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, फेडरेशनने त्यांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. महिला खेळाडूंचे मुख्य प्रशिक्षक WFI अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांना घाबरतात.’

‘तुम्ही मैदानात खेळाडूंच्या कानशिलात देतात’

बजरंग पुनिया यांनी फेडरेशन आणि अध्यक्षांवरही अनेक आरोप केले. तो म्हणाला, “तुम्ही खेळाडूला चापट मारता, तुम्हाला हा अधिकार कोणी दिला… ते गैरवर्तन करत आहेत आणि आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत.” कुस्तीपटूंनी फेडरेशनवर खेळाडूंना त्रास देणे, त्यांचा मानसिक छळ करणे, राजका०रण करणे आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. विनेशने इथपर्यंत मजल मारली की, कोणत्याही खेळाडूला काही झाले तर त्याला कुस्ती संघटनेचे अध्यक्ष जबाबदार असतील.

ब्रिजभूषण सिंह आरोपांवर काय म्हणाले?

जेव्हा पत्रकारांनी WFI अध्यक्षांना विचारले की महिला खेळाडूंचा लैंगिक छळ झाला आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले, “असे काही घडले नाही. माझ्यावरील एकही आरोप खरा ठरला तर मला फाशी होईल.” ब्रिजभूषण शरण सिंह हे 2011 पासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. कुस्तीपेक्षा ते राजकारणातील दिग्गज आहेत. ते उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. 6 वेळा लोकसभेचे खासदार आहेत. राज ठाकरे यांना अयोध्येला जाऊ देणार नाही, असे वक्तव्य त्यांनी अलीकडेच केले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.