Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्थायी सभापती सूर्यवंशी व भाजपचेच अतुल माने यांच्यात तुंबळ हाणामारी

स्थायी सभापती सूर्यवंशी व भाजपचेच अतुल माने यांच्यात तुंबळ हाणामारी


पोलिस ठाण्यासमोर व पालिकेच्या प्रवेशद्वारात घडल्या प्रकाराने शहरात तणाव

सांगली,ता.२०: महापालिकेतील भाजपचे माजी उपमहापौर व विद्यमान स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी व भाजपच्याच युवा मोर्चाचे सरचिटणीस अतुल माने यांच्यात आज महापालिकेच्या आवारात फ्री स्टाईल हाणामारी झाली. त्यानंतर दोघांच्याही समर्थकांनी महापालिका परिसराला वेढले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. समोरच असलेल्या शहर पोलिस ठाण्यातून तातडीने कुमक दाखल झाल्याने वातावरण निवळले. चैत्रबन नाल्याची निविदेवरून हा वाद झाल्याची चर्चा आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी:

आज स्थायी समितीची सभा होती. या सभेसाठी श्री सूर्यवंशी व अन्य सदस्य पालिकेत आले होते. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरु झाली. दरम्यानच्या काळात श्री माने महापालिकेच्या मंगलधाम कार्यालयात आले होते. ते महापालिकेतील विविध विकासकामाचे ठेके त्यांच्या समर्थकांकरवी घेत असतात. श्री माने ज्या प्रभागात काम करतात त्यात म्हणजे पोलिस मुख्यालयाच्या दक्षिण बाजूला वाहणाऱ्या चैत्रबन नाल्याच्या बांध बंदिस्तीसाठी दहा कोटींच्या विकास कामाची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्हा नियोजनमधून हे काम करण्यावरून तसेच हा निधी पालिकेऐवजी जिल्हा नियोजनकडे वर्ग करण्यावरूनही यापुर्वी वाद रंगला होता. आज श्री माने या कामासाठी महापालिकेत आल्याची माहिती श्री सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानंतर दोघांमध्ये फोनवरून बाचाबाची झाली. त्यांनंतर माने यांनी महापालिकेच्या मुख्यालय गाठले. सभा सुरु असतानाच मधेच श्री सूर्यवंशी बाहेर आले. दोघे समोरासमोर आल्यानंतर थेट जुंपली. काही नगरसेवक वाद सोडवण्यासाठी धावले. पोलिस आले. पोलिसांनी तत्काळ माने यांना बाजूला घेत शहर पोलिस ठाणे गाठले. त्यामळे वातावरण तंग झाले. ही वार्ता कार्यकर्त्यांना समजताच सारे पालिकेत धावले. संपुर्ण परिसर कार्यकर्त्यांनी वेढला. सायंकाळपर्यंत वातावरण तणावपूर्ण होते.भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी दोघांचीही फोनवरून समजून काढली. तथापि रात्री उशिरापर्यंत वाद धुमसत होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.