सांगली विद्यार्थी विषबाधा प्रकरणाची चौकशी करा..
सांगली : येथील खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारातून झालेली विषबाधा घटनेची शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. चौकशीनंतर पोषण आहार ठेकेदारावर कडक कारवाई करू, अशी ग्वाही ना. केसरकर यांनी दिली आहे, अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख (बाळासाहेबांची (शिवसेना) सचिन कांबळे, मनोज भिसे यांनी दिली.
ते म्हणाले, वानलेसवाडी येथील एका खासगी शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याचे समोर आले होते. पोषण आहाराचे सेवन केल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळणे, पोटदुखी, डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अन्न व औषध प्रशासनाने आहाराचे नमुने घेतले आहेत. त्यातून विषबाधा कशामुळे झाली, हे स्पष्ट होईलच पण ठेकेदाराचा हलगर्जीपणाही याला कारणीभूत आहे.
याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. या घटनेची चौकशी करावी. संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मंत्री केसरकर यांच्याकडे केली. केसरकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.