Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नोकरदार वर्गाला मिळणार गोड बातमी; घरभाडे भत्त्याच्या सवलतीची मर्यादा वाढणार

नोकरदार वर्गाला मिळणार गोड बातमी; घरभाडे भत्त्याच्या सवलतीची मर्यादा वाढणार


नवी दिल्ली: अर्थसंकल्पातून सरकार यंदा काय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी नाेकरदार वर्गाला गाेड बातमी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरभाडे भत्त्यातील सवलतीची मर्यादा वाढविली जाण्याची शक्यता आहे. बिगर-मेट्रो शहरांतील घरभाडे भत्त्यावर मिळणारी कर सवलत ५० टक्क्यांपर्यंत वाढविली जाऊ शकते. सध्या ही सवलत ४० टक्के आहे. मेट्रो शहरांत ही सवलत आधीच ५० टक्के आहे.

दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदी महागणार

यंदाच्या अर्थसंकल्पात दागिने व प्लास्टिकच्या वस्तूंसह अनेक उत्पादनांवरील आयात करात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वस्तू महाग होतील. 'आत्मनिर्भर भारत' योजनेस गती देण्यासाठी ३५ वस्तूंवरील आयात शुल्क वाढविण्याचा विचार सरकार करीत आहे. यात दागिने आणि प्लास्टिकच्या वस्तूंशिवाय खासगी जेट्स, हेलिकॉप्टर्स, महागडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, हाय-ग्लॉस पेपर आणि व्हिटामिन्स यांचा समावेश आहे.

करसवलतीसाठी 'डीएलएसएस' याेजना

सर्वसामान्यांना करसवलतीचा आणखी एक पर्याय मिळू शकताे. सरकार ईएलएसएसप्रमाणे डेट लिंक्ड सेव्हीग्स स्कीय अर्थात डीएलएसएस याेजना सादर करू शकते. कलम ८०सी मधील तरतुदींचा लाभ त्यात मिळू शकताे. यातून गाेळा झालेल्या निधीतील ८० टक्के रक्कम बाॅंडमध्ये गुंतवावी लागेल. ६०,०००रु. बिगर-वेतनधारी यांना सवलत मिळते. तसेच त्यांना ही सवलत वाढविली जाऊ शकते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.