Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी

अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी


मुंबई : महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांना औरंगजेबला पाठिंबा दिल्याने जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीच्या फोननंतर एकच खळबळ उडाली आहे. याबाबत कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन करणाऱ्याने अबू असीम आझमी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, "समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू असीम आझमी यांना औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध आयपीसीच्या कलम ५०६(२) आणि ५०४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे."


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.