पवारांनी - बिर्लांची भेट घेतली अन् निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादीला मोठा दिलासा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार पी. पी. मोहम्मद फैजल यांना केरळमधील एका सत्र न्यायालयाने खुनी हल्ल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा ठोठवली होती. त्यानंतर फैजल यांना संसदेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने फैजल यांना दोषी ठरविण्यास स्थगिती दिली आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (ता. ३०) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन निलंबनाची कारवाई मागे घेण्याची विनंती केली आहे... यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने येथे पोट निवडणूक जाहीर केली होती. ती निवडणूक आता थांबवत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्या संदर्भात आयोगाने पत्र जाहीर केले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कसबा विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर ? आघाडीत बिघाडीची शक्यता..... केरळमधील एका सत्र न्यायालयाने खासदार फैजल यांना २००९ मधील एका राजकीय प्रकरणात खुनी हल्ल्या प्रकरणी १० वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर २०१३ मधील लीली थॉमस प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा झाली असेल तर संबंधित लोकप्रतिनिधी तत्काळ निलंबित होतो. त्यानुसार फैजल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील संख्याबळ एकने घटले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज खासदार मोहम्मद फैजल यांना सोबत घेऊन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. केरळ उच्च न्यायालयाने फैजल यांना दोषी ठरविण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे फैजल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी ही कारवाई मागे घेण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना केली होती. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगानेही मोठा निर्णय घेतला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.