आरोग्य मंत्र्यांवर गोळ्या झाडणारा पोलीस अधिकारी आहे तरी कोण?
भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले असताना हल्ला झाला. नाबा दास कारमधून उतरताच त्यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच त्यांच्यावर गोळ्या घातल्या. त्यामुळे नाबा खाली कोसळले. त्यांना एअर अँबुलन्सने भुवनेश्वर येथे नेण्यात आले. प्रचंड सुरक्षा बंदोबस्त असतानाही हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांने केला गोळीबार
ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ त्यांच्यावर एकापाठोपाठ ५ राऊंड गोळीबार करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे नबा दास यांच्यावर गोळीबार करणारा दुसरा कोणी नसून पोलीस अधिकारी आहे. ASI गोपाल दास त्याचे नाव आहे. तो झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथील गांधी चौक पोलिस चौकीत तैनात होतो. गोपाल दासने आपल्या रिव्हॉल्वरने नबा दास यांच्यावर गोळीबार केला.
जवळून केला हल्ला
गोपाल दास याने पुर्ण नियोजनातून हा हल्ला केला. त्याने अगदी जवळून गोळी झाडली आहे. या हल्ल्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नबा दास कारमधून खाली उतरताच गोपाल दास याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर सत्ताधारी पक्ष बीजदच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पक्षाचे अनेक कार्यकर्ते आंदोलन करत आहे.
गोळीबार करुन फरार
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एका सार्वजनिक कार्यालयासाठी नबा दास प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्या स्वागतासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी जवळून गोळीबार करून एक पोलीस पळून जात असल्याचे लोकांनी पाहिले.
शनी शिंगणापूरला १ कोटींची देणगी
बिजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते नबा दास महाराष्ट्रातही चर्चेत आले होते. त्यांनी शनी शिंगणापूर मंदिराला एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा सोन्याचा कलश दान केला होता. १.७ किलो सोने आणि ५ किलो चांदीचा हा कलश होता.
सर्वात श्रीमंत मंत्री
नबा दास हे ओडिशा सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे संबलपूर, भुवनेश्वर आणि झारसुगुडा येथील विविध बँकांमध्ये 45 लाख रुपयांहून अधिक ठेवी आहेत. त्यांच्यांकडे सुमारे 15 कोटी रुपयांची 70 हून अधिक वाहने आहेत. ज्यामध्ये 1.14 कोटी किमतीची मर्सिडीज बेंझ देखील समाविष्ट आहे.
विधानसभेतही पॉर्न वादात सापडले होते
2015 मध्ये विधानसभेच्या अधिवेशनात नब किशोर दास पॉर्न पाहताना पकडले गेला होते. यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष निरंजन पुजारी यांनी त्यांना आठवडाभरासाठी निलंबित केले होते. त्यावेळी ते म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत एकही अॅडल्ट व्हिडिओ पाहिला नाही. इंटरनेट वापरत असताना चुकून हा प्रकार घडला. मला कळताच मी त्याच वेळी तो व्हिडिओ थांबवला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.