कर्मवीर पतसंस्थेच्या नांदणी शाखेचा वर्धापनदिन साजरा. पुढील काळात कर्मवीर पतसंस्था आधुनिक बैंकिगच्या सर्व सेवा देणारी संस्था असेल : श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील
सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली च्या नांदणी शाखेचा एकवीस वा वर्धापन दिन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमास जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ संस्थान नांदणी यांचे शुभ सानिध्य लाभले.
या शाखेच्या ठेवी १७कोटी आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी भुषविले. या शाखेला नांदणी वाशियांना भरभरून प्रेम दिल्यानेच या शाखेने ठेवी व कर्जामध्ये चांगली कामगिरी केली आहे. या शाखेने नांदणी आणि परिसरात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सेवेमुळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. याबद्दल चेअरमन श्री. रावसाहेब पाटील यांनी शाखेच्या प्रगतीचे कौतुक केले. कर्मवीर पतसंस्थेच्या एकून ठेवी ८८० कोटी असून ५८५ कोटीचे कर्ज वाटप आहे. रु. ३३५ कोटींची गुंतवणुक आहे. संस्थेचा स्वनिधी ७५ कोटीचा आहे. संस्थेची सभासद संख्या ५३००० असून संस्थेच्या ५८ शाखा कार्यरत आहे.
संस्थेच्या माध्यमातून सभासदांना चांगली व आधुनिक सेवा प्रदान करण्याचा संकल्प चेअरमन यांनी व्यक्त केला. त्यांनी सर्व ग्राहकांचे मनपूर्वक आभार मानले. बा शाखेचा या गावच्या प्रगतीस सदैव हातभार लागेल असे नमुद केले. या कार्यक्रमास शाखा सल्लागार श्री. रावसाहेब भगाटे, एन. डी. पाटील विठ्ठल सूर्यवंशी, अभिजीत पाटील यांचे सह बाबासो पाटील महावीर निटवे. बाळगोंडा पाटील बापुसो परिट राजू बुवणे यांचे सह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक, अॅड. एस.पी. मगदूम डॉ. रमेश ढवू, श्री. वसंतराव नवले, डॉ. एस. बी. पाटील (मोटके) तज्ञ संचालक श्री. लालासो थोटे यांचा शाखेच्या वतीने सत्कार करणेत आला. मुख्य अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांनी आभार मानले. यावेळी मोठया संख्येने सभासद व ठेवीदार उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.