Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एअरइंडिया : आता प्रवाशाच्या जेवणात सापडला दगड

एअरइंडिया : आता प्रवाशाच्या जेवणात सापडला दगड 


बिझनेस क्लासमध्ये एका महिलेवर मद्यधुंद प्रवाशाने लघुशंका केल्याच्या प्रकरणावरून एअर इंडियाची नाचक्की झालेली असतानाच आता या एअर इंडियाच्या विमानातील जेवणात दगड सापडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एका महिला प्रवाशाने ट्विटरवरून तिच्या जेवणाचा व तिच्या जेवणात सापडलेल्या दगडाचा फोटो शेअर करत एअर इंडियाच्या प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. सर्वप्रिया सांगवान असे त्या महिला प्रवाशाचे नाव असून ती 8 जानेवारी रोजी एअर इंडियाच्या दिल्लीवरून काठमांडूला जाणाऱ्या विमानाने प्रवास करत होती. 

या प्रवासादरम्यान एअर इंडियाकडून तिला देण्यात आलेल्या जेवणात दगड आढळून आला. त्यानंतर तिने याबाबत एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. 'दगड नसलेले जेवण एअर इंडियाच्या विमानात मिळवण्यासाठी तुम्हाला पैशांची गरज नाही. एअर इंडियाच्या AI 215 या विमानात दिल्या गेलेल्या जेवणात मला हे सापडलं आहे. मी याबाबत क्रू मेमंबर मिस जेडनकडे तक्रार केली आहे. या प्रकारचा हलगर्जीपणा अमान्य आहे' असे सर्वप्रिया यांनी ट्विट केले आहे. सोबत त्यांनी त्यांच्या जेवणात सापडलेल्या दगडाचा फोटोही शेअर केला आहे.


 

सर्वप्रिया यांच्या ट्विटनंतर एअर इंडियाने त्यांना तत्काळ रिप्लाय देत संबंधित व्यक्तीवर तत्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. 'हे अत्यंत गंभीर असून आम्ही हे प्रकरण आमच्या केटरिंग टिम कडे सोपवलं आहे. तुम्ही हे आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल तुमचे आभार. आम्ही या घटनेबाबत दिलगीरी व्यक्त करतो', असे एअर इंडियाने त्यांच्या स्टेटमेंट मध्ये म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.