Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'उडाण' अंतर्गत कवलापूरमध्येच विमानतळ करा आमदार सुधीर गाडगीळ: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

'उडाण' अंतर्गत कवलापूरमध्येच विमानतळ करा आमदार सुधीर गाडगीळ: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन


सांगली  :- कवलापूर (ता. मिरज) येथे विमानतळासाठी १६० एकर जागा आरक्षित आहे. या जागेवर पूर्वी धावपट्टी ही होती. कवलापूर येथे आरक्षण झाल्यास जिल्ह्याच्या कृषी व औद्योगिक विकासाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'उडाण' या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत या जागेवरच विमानतळ विकसित करावे, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आमदार गाडगीळ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी उद्योग विभागाचे प्रधान सचिव यांना सदर प्रस्ताव तातडीने तपासून सादर करण्याबाबत आदेश दिले आहेत.. सुमारे ६० वर्षांपूर्वी सांगली शहरापासून जवळ असलेल्या कवलापूर येथे विमानतळासाठी १६० एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. या जागेवर विमानासाठी धावपट्टीही तयार करण्यात आली होती. आजही तिथे धावपट्टीच्या खुणा आहेत. या जागेवरच विमानतळ व्हावे अशी समस्त सांगलीकरांची भावना आहे. मात्र अद्याप त्या ठिकाणी विमानतळ झालेले नाही. सध्या ही जागा औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. ही जागा काही कारणासाठी एका खाजगी कंपनीस विकण्याचा तथा विकसित करण्याचा प्रस्ताव झाला होता. त्यावेळेस सांगलीकर जनतेकडून त्या प्रस्तावास विरोध झाला होता. 

   त्यामुळे ही जागा विकण्याचा तथा विकसित करण्याचा प्रस्ताव रद्द झाल्याचे समजते. भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून सांगलीचा विकास वेगाने होत आहे. सांगलीपासून जवळच चार राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे या परिसरात शेती व उद्योगधंद्यांना पूरक वातावरण निर्माण होत आहे. मात्र मोठ्या कंपन्या सांगलीत उद्योगासाठी येण्यास विमानतळही महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी तसेच औद्योगिक विकासासाठी सदर प्रकल्प मंजूर करावा व सांगली कवलापूर विमानतळाच्या आरक्षित जागेसाठी आणखी काही जमीन अधिग्रहण करून व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदिजींच्या "उडान' या महत्वपूर्ण प्रकल्पाअंतर्गत या जागेवरच विमानतळाचा प्रकल्प पूर्ण करावा अशी मागणी गाडगीळ यांनी केली आहे....


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.