Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेला समाधान महाराज शर्मा यांची सदिच्छा भेट

कर्मवीर पतसंस्थेला समाधान महाराज शर्मा यांची सदिच्छा भेट


सांगली :- नुकतेच कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेला समाधान महाराज शर्मा यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी त्यांचे विधीवत स्वागत केले. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा सादर केला. संस्थेच्या ८३० कोटी आहेत. रु.५७२ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. भागभांडवल रु. २८ कोटी असून ७५ कोटी स्वनिधी आहे. संस्थेची सभासद संख्या ५२००० आहे. संस्थेची गुंतवणुक ३३१ कोटी इतकी आहे. संस्थेचे खेळते भांडवल ९८५ कोटी असून एकूण व्यवसाय रु.१४०५ कोटी इतका आहे. संस्थेच्या ५८ शाखामधून ठेव योजनाना सभासदांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या आर्शिवादपर मनोगतात महाराजांनी कर्मवीर आण्णांच्या जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या. कर्मवीर आण्णांनी जीवनामध्ये स्वतः तप केले त्यामुळे अनेकांना पत मिळाली. लक्ष्मीबाईनी स्वतःच मंगळसुत्र विकलं आणि समाजाची पोरं शिकवली. समाजाला ताकद दिली. त्यामुळे समाजानं त्यांना संत पदाला नेऊन ठेवलं. स्वतःला ध्येयासाठी गाडून घेतल्या शिवाय मोठ होता येत नाही. जीवनामध्ये गुरुला मोठे स्थान आहे. ते समाजाला मोलाचं मार्गदर्शन करुन योग्य पथ दाखवितात असे त्यांनी सांगितले. इथं मला प्रत्येक माणसामध्ये नम्रता जाणवली. त्याचमुळे संस्था मोठया होतात. संस्थेचा व्याप खुप मोठा व्हावा अशा शुभेच्छा महाराजांनी या वेळी दिल्या.


यावेळी उद्योजक मनोहर सारडा माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई. श्री. आर. बी. पाटील श्री. शितल पाटील श्री. विजय सपकाळ, श्री. कल्लाप्पा सुतार श्री. शंकरराव पोतदार यांचे हस्ते सत्कार करणेत आले या कार्यक्रमास संस्थेचे व्हा.चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे संचालक अॅड. एस. पी . मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढबू संचालिका श्रीमती भारती चोपडे तज्ञ श्री. लालासाहेब भाऊसाहेब . थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम हे उपस्थित होते. आभार संचालक श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले यांनी मानले. कार्यक्रमास संस्थेचे सेवक व अधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.