Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी सैनिकाने घातला 'अग्निवीरां'च्या बनावट भरतीचा घाट ; अनेकांना लाखोंचा गंडा

माजी सैनिकाने घातला 'अग्निवीरां'च्या बनावट भरतीचा घाट ; अनेकांना लाखोंचा गंडा


नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिन्ही सैन्य दलांमध्ये तरुणांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी 'अग्नीवीर' योजना आणली. ही योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यातही अडकली होती. पण आता या भरतीमधील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. कारण याअग्निवीरसाठीचे बनावट भरतीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

केरळच्या त्रिवेंद्रम याठिकाणी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी असणाऱ्या मिलिटरी इंटेलिजन्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘कोल्लम जिल्ह्यात राहणारा बिनू एम. नावाचा एक माजी सैनिक ‘अग्नीवीर’ भरतीचे बनावट रॅकेट चालवत होता. यासाठी त्याने इंडियन आर्मीच्या नावाने केरळमधील २५ ते ३० जणांची नोकरीच्या आमिषाने आर्थिक फसवणूक केली. त्यांच्याकडून त्याने सुमारे ३० लाख रुपये उकळले आहेत. दरम्यान, त्याचा हा भामटा प्रकार लवकरच उघडकीस आल्याने भविष्यतील आणखी बनावट भरती रोखण्यात मदत झाली आहे. दरम्यान, ‘अग्नीवीर’ची पहिली बॅच नुकतीच प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली आहे. लष्करभरतीचे स्वप्न बाळगलेल्या तरुणांनी यासाठी सहा महिन्यांचे लष्करी प्रशिक्षण घेतले आहे. यानंतर ते लष्करात विविध सेवांमध्ये रुजू झाले आहेत. मोदी सरकारसाठी ‘अग्नीवीर’ हा तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सोडवणारा महत्वाचा कार्यक्रम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्नीवीर योजना जाहीर केल्यानंतर ही तरुणांची दिशाभूल करणारी योजना असल्याचे सांगत त्यावर टीका होऊ लागली. त्यानंतर तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी स्वतः पत्रकार परिषदा घेऊन ही योजना कशी चांगली आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच विरोध करणाऱ्यांचे आरोपही खोडून काढले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.