Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनधिकृतरित्या पॅथॉलॉजी चालविल्याने सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा कायम

अनधिकृतरित्या पॅथॉलॉजी चालविल्याने सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा कायम


परभणी : अनधिकृतरित्या पॅथॉलॉजी लंब चालविल्याप्रकरणी डॉ. सालेह कौसर आणि लॅब टेक्निशियन मोहम्मद इमरान गांधी यांना सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा कायम करण्यात आली आहे. परभणीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांनी गुरुवारी या दोन्ही आरोपींची सहा महिने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा कायम केल्याचा निकाल दिला.

या प्रकरणात साक्षी पुराव्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी २० सप्टेंबर २०१६ रोजी दोन्ही आरोपींना सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार दंडाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरुद्ध आरोपींनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. या प्रकरणात सुनावणी दरम्यान आरोपीतर्फे युक्तिवाद करण्यात आला. सरकारी पक्षातर्फे आशिष दळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय तसेच गुजरात उच्च न्यायालय यांचा असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट ऑफ भावनगर सेक्रेटरी हेल्थ डिपार्टमेंट या १७ सप्टेंबर २०१० न्यायनिर्णयाचा दाख दिला तसेच

पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन नानलपेठ यांनी त्यांच्या हद्दीतील अनधिकृत पॅथॉलॉजी चालवत असल्याबाबत डॉ. सालेह कौसर, कौसर हॉस्पिटल व लॅब टेक्निशियन मोहम्मद इमरान 'गांधी यांच्याविरुद्ध २९ ऑक्टोबर २०१० रोजी महाराष्ट्र राज्य वैद्य व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांनी निर्णय  दिला. ज्यामध्ये 'डॉ. सालेह कौसर यांचे शैक्षणिक पात्रता ही एमबीबीएस असल्यामुळे त्या त्याच क्षेत्रात व्यवसाय करू शकतात तसेच पॅथॉलॉजी रिपोर्टवर सही करण्याचा अधिकार केवळ जो व्यक्ती एमबीबीएस, एमडी पॅथॉलॉजी अशी शैक्षणिक पात्रता धारण करणारा आहे.

त्यामुळे लॅब टेक्निशियन डीएमएलटी अशी पात्रता धारण करणारा आरोपी मोहम्मद इमरान गांधी यांनी पॅथॉलॉजी रिपोर्टवर सही करणे चुकीचे व बेकायदेशीर आहे. तसेच डॉ. सालेह कौसर यांनी कौसर हॉस्पिटल येथे डीएमएलटी व्यक्तीस नेमणूक ठेवून पॅथॉलॉजी लॅब चालविणे हा गुन्हा आहे. त्यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांनी दोन्ही आरोपींची सहा महिने सक्त मजुरी व दंडाची शिक्षा १७ नोव्हेंबरच्या न्यायनिर्णयाने कायम केली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे आशिष दळे यांनी काम पाहिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.