फसवणुकीतील फरारीस १७ वषार्नंतर अटक सांगली एलसीबीची कारवाई
पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी फरारी संशयितांना अटक करण्यासाठी विशेष मोहीम आखण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सांगलीचे पोलिस अधीक्षक डॅ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी एलसीबीला यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे एक पथक तयार केले होते.
सांगली शहर पोलिस ठाण्यात २००७ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात निलेश शेवाळे हा फरारी होता. मंगळवारी सकाळी शेवाळे सांगलीतील मध्यवतीर् बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती निरीक्षक शिंदे यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सापळा रचून शेवाळे याला ताब्यात घेतले. त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.