Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलानेच वडिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले.


एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्यास वडिलांनी नकार दिल्याने मुलानेच वडिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.


सोहेल बागवान अस संशयित मुलाचे नाव असून ३० डिसेंबर रोजी ही घटना घडल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली. याप्रकरणी लातूर येथील एक अल्पवयीन मुलीसह तीच्या अल्पवयीन भावालाही पोलिसांनी अटक केली आहे. लातूर येथील एका अल्पवयीन मुलीसोबत सोहेल बागवानचे प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करणार होते. परंतु, त्यांच्या लग्नास वडिल अफजल बागवान यांचा विरोध होता. त्यामुळे सोहेल हा आपल्या वडिलांवर चिडून होता. दरम्यान अल्पवयीन मुलीचा भाऊ शुक्रवारी सकाळी लातूर येथून पंढरपुरात आले होते. पंढरपुरातील नवीन एसटी बस स्थानकासमोर त्यांनी सोहेल बागवान भेट घेतली. त्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि तीच्या भावाने तहसील कार्यालयाजवळ जावून अफजल बागवान यांची भेट घेवून कासेगाव येथे मामाकडे जायचे आहे असे खोटे सांगून रिक्षात बसवून नेले.

पंढरपूरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच रिक्षा थांबवून ते पायी पुढे गेले. दरम्यान रस्त्यात दबा धरून बसलेल्या सोहेल बागवान याने वडील अफजल बागवाने यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यावेळी सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीने व तीच्या भावाने अफजल बागवान यांचे हातपाये बांधून डोक्यात दगड घालून खून केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.