Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रात्रीत घरे पडणाऱ्या आ, गोपीचंद पडळकर व त्यांच्या साथीदारावर दहशतवादी हल्ला व मोका अंतर्गत कारवाई करा -- प्रा,प्रमोद इनामदार

रात्रीत घरे पडणाऱ्या आ, गोपीचंद पडळकर व त्यांच्या साथीदारावर दहशतवादी  हल्ला व मोका अंतर्गत कारवाई करा --  प्रा,प्रमोद इनामदार


काल रात्री 2 वाजता शिवाजी रोड ,एसटी स्टँड समोर खाजा वस्ती, येथे आ,गोपीचंद पडळकर ,श्री, ब्रह्मानंद पडळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी काट्या,कुराडी, तलवारी, चार बुलडोझर ,यांच्या समवेत घेऊन या खाजा वस्तीवर हल्ला केला व सर्व दुकाने हॉटेल घरे ही रात्रीच पाडण्यात आली आणि त्याला प्रशासन ,पोलीस व सत्ताधारी  प्रस्थापित नेते यांच्या संगनमताने हे कृत्य करण्यात आले, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहे, असे मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रा, प्रमोद इनामदार यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बसवराज तेली,,, यांना देण्यात आले त्यांनी या निवेदनात असे म्हटले आहे की गेली शंभर वर्षांपासून ही वस्ती अस्तित्वात आहे, गोरगरीब सर्वसामान्य बहुजन समाजातील नागरिक या ठिकाणी राहतात त्यांना महानगरपालिकेने नळकनेक्षण दिलेले आहे, महावितरण कंपनीने विद्युत कनेक्शन दिलेले आहे, ते या जागेची घराची घरपट्टी ,पाणीपट्टी सरकारी नियमाप्रमाणे भरतात, आणि अशा नागरिकांना रात्री दोन वाजता येऊन हल्ला चढवणे हे निषेधार्थ बाब आहे, आ, गोपीचंद पडळकर यांनी 2000 गुंड त्यांच्या हातात काठी, कोयते, तलवारी, चाकू ,चार बुलडोझर ,असा लवाजमा घेऊन या वस्ती वरती हल्ला चढवला व तेथील मेडिकल दुकान हॉटेल आणि रेस्टॉरंट राहती घरे ,अशा पद्धतीने करोडोंची मालमत्ता मालमत्तेची नुकसान केले, यांच्यावर योग्य कारवाई करून त्यांना मोका व दहशतवादी हल्ल्याचे कृत्य केल्याच्या गुन्हा नोंद करावा हे चालू असताना जेसीबीच्या मशीनमुळे बरेच नागरिक जखमी झाले, त्यांना मिरज सिविल मध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहे.

अशी दहशत माजवून दुसऱ्यांच्या मालमत्तेवरती कब्जा मिळवणे हे लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीला शोभा देत नाही, आमदार पडळकर व नामदार सुरेश भाऊ खाडे या दोघांमध्ये बिल्डर व डेव्हलपर भागीदारी असून ही दोन्ही व्यक्ती मिरज तालुक्याच्या बाहेरील असून मिरज शहरांमध्ये येऊन दहशतीचे वातावरण पसरवत आहेत, यांना आमदारकी पदावरून व मंत्रीपदावरून श्री एकनाथ शिंदे साहेबांनी व फडणवीस साहेबांनी तातडीने बडतर्फ करून हकलपट्टी करावी व त्यांच्यावर सह आरोपी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रा, इनामदार सरांनी केलेली आहे, जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू असताना रात्री दोन वाजता गरिबांच्या वस्तीवर हल्ला करणे लोकप्रतिनिधी शोभत नाही, त्यांचा प्रस्थापित सरकारने योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जोरदार आंदोलन करेल याची शासनाने दखल घ्यावी यावेळी श्री जैलाब शेख, श्री उत्तम आबा कांबळे, श्री रूपेंद्र कांबळे ,अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.