Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्नाटकात जाऊन देवेंद्र फडणवीसांची कन्नडमधून भाषणाला सुरुवात

कर्नाटकात जाऊन देवेंद्र फडणवीसांची कन्नडमधून भाषणाला सुरुवात


कर्नाटकच्या चिक्कमंगलुरू येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी भाषणाची सुरूवात थेट कन्नड भाषेतून केली. त्यानंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत फडणवीसांचं अभिनंदन केलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"आज पर्यंत मी अनेक शहरांमध्ये गेलो. मात्र, चिक्कमंगलुरू इतकं स्वच्छ शहर मला कुठेही दिसलं नाही. जेव्हा मी या शहरात दाखल झालो, तेव्हा येथील स्वच्छता बघून भारावून गेलो. याचे पूर्ण श्रेय सीटी रवी यांचं नेतृत्व आणि महानगर पालिकेच्या कर्मचार्यांना जातं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्र-कर्नाटकचे खूप जुने संबंध

"महाराष्ट्र आणि कर्नाटकचे खूप जुने संबंध आहे. मराठी आणि कन्नड या दोन्ही प्राचीन आणि समृद्ध भाषा आहेत. दोन्ही भाषेतील साहित्य नागरिकांना दिशा देणारं आहे. त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं, तेव्हा मी लगेच हे निमंत्रण स्वीकारलं. मी इथे आलो, त्याचं आणखी एक कारण म्हणजे, माझे बंधू सीटी रवी यांच्या प्रेमामुळे. ते जे काही करतात, ते मोठं असतं, त्यामुळे इथे येऊन मोठा महोत्सव मला बघायला मिळेल याची खात्री होती, म्हणून मी या कार्यक्रमाला आलो, असेही ते म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.