Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आयकर विभागाकडून पॅनकार्ड संदर्भात नव्या सूचना..

आयकर विभागाकडून पॅनकार्ड संदर्भात नव्या सूचना..


'ही' प्रक्रिया लवकर पूर्ण न केल्यास होईल तुमचे पॅनकार्ड बंद

नवी दिल्ली : आयकर विभागाकडून पॅनकार्ड संदर्भात नव्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील अनेक दिवसांपासून आयकर विभाग पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याची सूचनाना देत आहे. त्यात आता पुन्हा एकदा आयकर विभागाने नव्याने ट्वीट करत सर्वांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्लाही आयकर विभागाने दिला आहे.

आयकर विभागाकडून एक ट्वीट करण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये ज्या पॅनकार्ड धारकांनी आपले पॅन अद्याप आधारशी लिंक केलेले नाही, त्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे सांगितले आहे. तसेच, आयकर विभागाने ट्वीट करत सर्वांना एक इशाराही दिला आहे. जर दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्या संबंधित व्यक्तीचे पॅनकार्ड निष्क्रिय केले जाईल, असा इशारा आयकर विभागानं दिला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये, आयकर विभागाने म्हटले,”आयकर कायदा 1961 नुसार, सर्व पॅनकार्ड धारक जे Exempt Category मध्ये येत नाहीत, त्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत त्यांचं पॅन आधारशी लिंक करावं. 1 एप्रिल 2023 पासून आधारशी लिंक न केलेले पॅनकार्ड निष्क्रिय होतील. ही एक तातडीची सूचना आहे, म्हणून उशीर करु नका, आजच लिंक करा!”

दरम्यान, आयकर विभागाचं हे ट्वीट अर्थ मंत्रालयानेही रिट्वीट केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आयकर विभागाने लोकांना 31 मार्च 2022 पर्यंत पॅन आणि आधार लिंक करण्यास सांगितले आहे. परंतु यासाठी तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. 1 जुलै 2022 ते मार्च 2023 दरम्यान पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. अशातच जर या मुदतीत तुम्ही दोन्ही लिंक न केल्यास तुमचे पॅनकार्ड अवैध किंवा रद्द होईल, असे सांगण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.