Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ह.टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्यावतीने टाकळीच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार

ह.टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्यावतीने टाकळीच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार


मिरज येथील हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या वतीने टाकळी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे होते. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे म्हणाले की, मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता सरपंच व त्यांच्या सदस्यांनी जनतेची कामे करावीत आणि आदर्श टाकळी ग्रामपंचायत बनवून गावचा नावलौकिक राज्यात वाढवावा असे आवाहन केले.

हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख म्हणाले की, गावातील मतदारांनी निवडून दिल्यामुळे सरपंच व सदस्यांनी गावचा सर्वांगीण विकास करावा.  आमदार,खासदार, केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून राज्यातील ग्रामपंचायतीना मोठा निधी मिळत असतो,तेव्हा काम करण्यास या ठिकाणी मोठा वाव आहे.निवडून आलेल्या सरपंच व सदस्याला काम करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे.कामाच्या माध्यमातून जनतेला आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा निर्माण करून दाखवावा.जेणेकरून एकदा नाही तर जनता आपल्या कामाची कायमस्वरूपी दखल घेऊन आपणाला सतत निवडून देईल.दिलेल्या संधीचे सोने करण्याची जिद्द अंगी बाळगून जनतेची कामे करावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी टाकळीचे सरपंच हिना नदाफ सत्कार प्रसंगी  म्हणाले की जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखविलेला आहे तसेच जनतेने जे मला संधी दिलेले आहे नक्कीच मी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही मी विकास कामावर भर देऊन मतदार संघाचा चेहरा मोरा बदलण्याचा प्रयत्न करेन असे म्हणाल्याया सत्कार समारंभास टाकळीच्या सरपंच सौ.हिना असिफ नदाफ,ग्रामपंचायत सदस्य विमल जयराम वाघमारे, रोहिणी कुलभूषण उपाध्ये,रिदा सुलेमान मुजावर,पूजा अनिल भोसले,सुरेखा राजकुमार पाटील,फकृदिन जैनुद्दीन नांद्रेकर,आदींसह शिवसेना गुंठेवारी समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय बल्लारी,नासिर शेख,अरबाज काजी,झेन सय्यद,फिरोज शेख,सागर मेटकरी,साद गवंडी,प्रमोद वाघमारे,माजी उपसरपंच सुलेमान मुजावर,लतिफा शेख, पत्रकार आदिल मकानदार,सुधीर गोखले,जमीर शेख,नासिर शेख, अरबाज काजी,झेन सय्यद, अभियंता फिरोज शेख, शिवसेनेचे सागर मेटकरी, साद गवंडी,साद मुल्ला,इजाज सौदागर,मोहसीन फानिबंध, इलियास हुजरे व सलीम कनवाडे आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे मान्यवर लतीफ शेख,सूर्यकांत कुकडे,पत्रकार आदिल मकानदार,विजय बल्लारीसह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंचासह टाकळीच्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला शेवटी आभार टाकळी ग्रामपंचायतचे सदस्य फक्रुद्दीन जैनुद्दीन नांद्रेकर यांनी मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.