Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत आज नारी शक्तीचा सन्मान

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत आज नारी शक्तीचा सन्मान


राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हरियाणातील कुरुक्षेत्र राज्यात येवून ठेपली आहे. कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही यात्रा काश्मिर पासून अगदी काहीचं अंतरावर आहे. तर देशातील विविध राज्यातून ही यात्रा गेली असुन या यात्रेस देशातील नागरिकांचा उत्सफूर्त सहभाग मिळाला.

अगदी सर्वसामान्य मानसांपासून ते मोठ मोठे नेते, अभिनेते, कलाकार, अर्थतज्ञ या यात्रेत सहभागी झाले. तरी आज कुरुक्षेत्र जिल्ह्यातून जाणारी आजची भारत जोडो यात्रा खास आहे. कारण आजच्या यात्रेत ऑल वून वॉक असल्याची घोषणा खुद्द राहुल गांधींनी केली आहे. राहुल गांधींंची कुरुक्षेत्र जिल्ह्यातून जाणारी आजची भारत जोडो यात्रा ही ऑल वूमन वॉक यात्रा असेल. तरी महिला सक्षमीकरण आणि देशभरातील महिलांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती राहुल गांधींनी दिली आहे.

हरियाणा त्यात कुरुक्षेत्र जिल्हा हे तेच स्थळ आहे जेथे महाभारत घडलं होतं. एक नारी सन्मानासाठी झालेलं युध्द हीचं कुरुक्षेत्राची ओळख आहे. तरी त्याचं भुमिवर आवर्जुन वुमन वॉकचं नारी आयोजन करत नारी शक्तीचा सन्मान करणं हा सत्ताधारी पक्षाला सुचक वक्तव्य आहे. किंबहूना ज्या क्षेत्रात, ज्या लोकांसाठी काम करण्यास मोदी सरकार कमी पडले तेचं सगळं राहुल गांधींनी हेरुन या भारत जोडो यात्रेत त्यावरचं काम करायला सुरु केलं आहे. तरी भारत जोडो यात्रेतील आज नारी शक्तीचा सहभाग देशातील राजकारणात काय पडसाद उमटवतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

डिसेंबरच्या सुरुवातीला जेव्हा भारत जोडो यात्रा राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील पीपुलवाड्याकडे निघाली होती तेव्हा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महिला शक्तीकरण दिनानिमित्त महिलांसोबत भारत जोडो यात्रेचा प्रवासाची योजना आखली होती. तरी राजस्थानातील महिलांकडून या सगळ्यांना उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर १९ नोव्हेंबरला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देखील महिला सहभागाचा हाचं फंड चालवला गेला आणि त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला. त्यामुळेचं कदाचित राहुल गांधी पुन्हा एकदा हाच पैतरा आजमवणार आहेत. पण यांस हरियाणाच्य महिला कश्या प्रतिसाद देणार हे बघणं अधिक महत्वाचं ठरणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.