Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माकडाला खायला देताना सेल्फी काढण्याच्या नादात शिक्षकाचा पाय घसरला

माकडाला खायला देताना सेल्फी काढण्याच्या नादात शिक्षकाचा पाय घसरला


600 फूट खोल दरीतून बाहेर काढायला नऊ तास लागले

पुणे: पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाटात सेल्फी घेताना 600 फूट खोल दरीत पडलेल्या शिक्षकाचा मृतदेह काढण्यात आला आहे. नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर स्थानिक रेस्क्यू टीमला मध्यरात्री यश आलं. अब्दुल शेख असं मृत्यू झालेल्या शिक्षकाचं नाव होतं. घाटात वाघजाई मंदिर परिसरात,गाडी रस्त्याच्या कडेला लावून माकडांना खायला देत होते. ही घटना सायंकाळी पाच वाजता घडली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. शिक्षक दरीत खाली पडल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना सांगितली, त्यानंतर त्यांच्या शोधकार्याला सुरुवात करण्यात आली.

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शिक्षकाचा मृतदेह रेस्क्यू टीमने आणि स्थानिकांनीवरती आणला. महाडची साळुंखे रेस्क्यू टीम आणि भोरच्या सह्याद्री सर्च रेस्क्यू टीमकडून हे शोधकार्य करण्यात आलं. या घटनेत मृत्यू झालेले अब्दुल कुदबुद्दीन शेख हे मुळचे रा.एरंडी कोरंगळा जि. लातूर येथील आहेत. ते त्यांच्या पत्नीसह भोर तालुक्यातील नसरापूर येथे राहत होते. त्याचबरोबर ते मंडणगड जि. रत्नागिरी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. त्यांची पत्नी करंजावणे ता. वेल्हा येथे प्राथमिक शिक्षिका आहे.

भोरहून वरंध घाट मार्गे मंडणगडला जात असताना रस्त्यात सेल्फी घेण्यासाठी थांबले, त्यावेळी त्यांचा अपघात घडला आसावा असा अंदाज स्थानिकांनी पोलिसांनी दिला. घटनास्थळी संबंधित व्यक्तीची MH03 BE 7415 नंबर लाल रंगाची कार आढळून आली आहे. त्यावरुन पोलिसांनी पुढील तपास केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.