Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रावसाहेब पाटलांचे कार्य लोकोपयोगी व पारदर्शक.. - माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम

रावसाहेब पाटलांचे कार्य लोकोपयोगी व पारदर्शक.. - माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम


सांगली दि.१५: डॉ. पतंगराव कदम व स्वदेशीच्या रावसाहेब पाटील यांचे घनिष्ठ संबंध होते . त्यांनी दक्षिण भारत जैन सभा, कर्मवीर पतसंस्था, शिक्षण संस्था महामंडळ, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी आणि तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करुन जनमानसात ठसा उमटविला आहे. माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांनी कौतुक केलेल्या कर्मवीर पतसंस्थेतून ते राज्यातील सहकारी क्षेत्राला चांगला संदेश देणारा व सामान्य माणसाला पत देणारे कार्य उभे केले आहे. डॉ. पतंगराव यांच्या काळापासून रावसाहेबांच्या शब्दाला आमच्या कदम कुटुंबांत मान आहे. त्यांचे सार्वजनिक काम लोकोपयोगी व पारदर्शक आहे.स्वदेशी व विविध संस्थांच्या वतीने माझा वाढदिवस साजरा केल्यामुळे मी गहिवरून गेलो असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.  आज सांगलीत स्वदेशी परिवार व विविध सार्वजनिक संस्थांच्या वतीने आयोजित त्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रारंभी रावसाहेब पाटील अण्णा यांनी स्वागत करताना डॉ. पतंगराव कदम आणि कदम कुटुंबांचा स्वदेशी परिवाराशी असलेला ऋणानुबंध सांगून डॉ. पतंगराव यांच्यामुळे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगावर झालेल्या निवडीची आठवण सांगून डॉ. पतंगराव, आ. मोहनशेठ, डॉ. शिवाजीराव व माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांचे महाराष्ट्राच्या प्रगतीत बहुमोल योगदान आहे असे गौरवोद्गार काढले. प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी प्रास्ताविकात आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या कार्याचा आढावा घेऊन सूत्रसंचालन केले.  स्वदेशी परिवारातर्फे डॉ. कदम यांना ओवाळून औक्षण करुन केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. रावसाहेब पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. डॉ.जितेश कदम यांचा सत्कार सागर पाटील यांनी केला. 


यावेळी डॉ. कदम म्हणाले, 'डॉ. पतंगराव कदम यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचारानुसार बहुजन समाज शिक्षणाचे कार्य केले.कर्मवीर भाऊराव, स्व. वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न कदम कुटुंबांनी केला आहे. डॉ. पतंगराव कदम, आ. मोहनशेठ व डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस कडेगाव मतदारसंघात जात पात धर्म निरपेक्ष काम केले. महिला वर्गांचा आशीर्वाद आणि मतदार संघातील जनतेचे प्रेम यामुळे मी काम करत आहे. सांगली जिल्ह्य़ातील जनतेच्या विकासाचे काम अव्याहतपणे सुरू आहे.शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. '


यावेळी दक्षिण भारत जैन सभा, कर्मवीर पतसंस्था, तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ, वीराचार्य पतसंस्था, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, सांगली जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, जिनगोंडा पाटील ग्रामवाचनालय ब्रम्हनाळ, ब्रम्हनाळ ग्रामस्थ, गणेशनगर शहरवासिय, जैन महिलाश्रम आदी संस्था नांदणी सहकारी बँके, जयपाल चिंचवाडे व वसंतराव नवले यांनी डॉ. कदम यांचा सत्कार करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील,ट्रस्टी शांतीनाथ नंदगावे, माजी महापौर सुरेश पाटील,लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सुहास पाटील,जयंत नवले, चंद्रकांत पाटील, अभय पाटील, मिलिंद चौधरी, स्वदेशी परिवारातील सौ. कांचन रावसाहेब पाटील, सागर पाटील, स्नुषा सोनाली आणि तेजस्विनी, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे विजय पाटील, अविनाश पोरे व पदाधिकारी, कर्मवीर पतसंस्थेचे डॉ. अशोक सकळे, एस. पी. मगदूम व वसंतराव नवले व संचालक , तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचे डॉ. बाळासाहेब चोपडे,अजितप्रसाद पाटील, पोपट डोर्ले, मिलिंद भिलवडे, महावीर चौगुले, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे प्रा. आर. एस. चोपडे व विनोद पाटोळे प्रा. एम. एस. रजपूत प्रा. शिवपुत्र आरबोळे व प्राचार्य एस. के. पाटील ,वीराचार्य पतसंस्थेचे शशिकांत राजोबा, अरुण कुदळे, दादासाहेब पाटील, एन. जे. पाटील, ब्रम्हनाळचे माजी सरपंच अशोक पाटील, बंधू अरुण पाटील व पुतणे विपुल पाटील, सुदर्शन मद्वाण्णा व ग्रामस्थ, वांगीचे प्रकाश, दिपक विजय व किरण सुर्यवंशी व सहकारी, गणेशनगरचे रविंद्र वळवडे, सतीश सारडा व नागरिक , जैन महिलाश्रमच्या चेअरमन अनिता पाटील, नांदणी बँकेचे चंद्रकांत कोरुचे उपस्थित होते. स्नेहभोजनाने हा कार्यक्रम संपन्न झाला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.