Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चोरीला गेलेले १५ लाखांचे मोबाईल फोन हस्तगत..

चोरीला गेलेले १५ लाखांचे मोबाईल फोन हस्तगत..



सांगली पोलिसांनी अशाच गहाळ मोबाईलच्या नोंदी एकत्रित केल्या. सायबर शाखा व एलसीबीच्या पथकाने कौशल्यपुर्ण तपास केला. एक दोन नव्हे, तर तब्बल १५ लाख रुपये किंमतीचे मोबाईल मिळवण्यात यश आले. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी प्राजासत्ताकदिनाचे औचित्य साधत ११० नागरीकांना त्यांचे मोबाईल सुस्थितीत परत दिले. त्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर जणू आनंदच पसरला.

मागील वर्षात जिल्ह्यात मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक नोंदी पोलिस ठाण्यात झाल्या. प्रामुख्याने गर्दीचया ठिकाणांसह अन्य ठिकाणी मोबाईल गहाळ झाले होते. तक्रारदारांनी नोंदी दिल्या. काही दिवस वाट पाहिली. मोबाईल परत मिळेल याची आशा सोडून दिली. पोलिस दलाने हे मोबाईल कोणत्याही परिस्थितीत परत मिळवायचेच, असा चंग बांधला. सायबर पोलिस व एलसीबी पथकाने तांत्रिक तपासाधारे शोध मोहीम राबवली. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे व सायबरचे उपनिरिक्षक रोहिदास पवार यांनी स्वतंत्र पथके कार्यरत केली होती.

पथकाने तांत्रिक तपास केला. कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून १५ लाख रुपये किंमतीचे ११० मोबाईल शोधून ते हस्तगत करण्यात यश मिळविले. निरीक्षक सतिश शिंदे, उपनिरिक्षक रोहीदास पवार, सचिन कनप, विकास भोसले, करण परदेशी, महादेव घेरडे, अमिन सय्यद, संदिप पाटील, प्रकाश पाटील, सचिन कोळी, अजय पाटील, अमोल शिरसागर, सुनिल मदने, स्वप्निल नायकवडे, विवेक साळुंखे, श्रीधर बागडी, निकास भोसले, इस्लामपुरचे अमोल सावंत, अलमगीर लतीफ, मिरजेचे सचिन सनदी, कडेगांवचे शिवाजी माळी, आष्टाचे अमोल शिंदे, नितीन पाटील, शिराळ्याचे नितीन यादव, महात्मा गांधी चौकीचे बसवराज कुंदगोळ, विश्रामबागचे धीरज यादव यांचा कारवाईत सहभाग होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.